शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
5
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
6
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
7
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
8
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
9
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
10
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
11
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
12
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
13
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
14
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
15
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
16
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
17
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
18
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!

बोंडअळीसह इतर रोगराईचे आक्रमण; कपाशी पिकावर फिरविले रोटावेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 16:35 IST

संग्रामपूर : तालुक्यातील निरोड शिवारात शेतकºयाने कपाशी पिकावर रोटावेटर फिरविले आहे. बोंडअळी तसेच इतर रोगराईने कपाशी पिक हातचे निघून जात असल्याने शेतकºयाने हा निर्णय घेतला. यामुळे शेतकºयांसमोरील संकट अधिकच गडद होताना दिसते.

ठळक मुद्देपिकावरील रोगराई जात नसल्याने उभ्या पिकावर रोटावेटर चालविण्याची वेळ आली आहे.कपाशीची लागवड केलेल्या एक एकर शेतात त्यांनी रोटावेटर केले.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : तालुक्यातील निरोड शिवारात शेतकºयाने कपाशी पिकावर रोटावेटर फिरविले आहे. बोंडअळी तसेच इतर रोगराईने कपाशी पिक हातचे निघून जात असल्याने शेतकºयाने हा निर्णय घेतला. यामुळे शेतकºयांसमोरील संकट अधिकच गडद होताना दिसते.अनंता विलासराव अवचार यांचे गट क्र.२७२ मध्ये एक एकर शेत आहे. त्यांनी यावर्षी कपाशीची लागवड केली. मशागतीची कामे सुध्दा वेळच्यावेळी केली. निंदन, रासायनिक खत, महागड्या औषधांची फवारणी सुध्दा केली. मात्र पिकावरील रोगराई जात नसल्याने उभ्या पिकावर रोटावेटर चालविण्याची वेळ आली आहे. कपाशीची लागवड केलेल्या एक एकर शेतात त्यांनी रोटावेटर केले. कपाशी पिकावर कोकडा, लाल्या व बोंडअळीने आक्रमण केल्याने पिकाची वाढ खुंटली आहे. महागडी खते तसेच औषधांची फवारणी केल्याने मोठा आर्थीक फटकाही अवचार यांना सहन करावा लागला. अवचार यांचेकडे भारतीय स्टेट बँक शाखा संग्रामपूरचे ९० हजार रुपये कर्ज आहे. तसेच निशांत बँक शाखा संग्रामपूरचे ७५ हजार रुपये कर्ज आहे. यावर्षी चांगले पीक येईल, या आशेवर शेतकºयाने कर्ज काढून पेरणी केली. मात्र उत्पन्न येण्याआधीच पिकावर रोटावेटर फिरविण्याची वेळ आली. आधीच पाऊस अल्प प्रमाणात पडला, त्यात पिकांवर संक्रांत आल्याने काय करावे, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.नैसर्गीक संकटांमुळे शेतकºयांचे कंबरडे मोडल्या जात आहे. शासनाकडून शेतकºयांना मदतीची घोषणा होते, मात्र वेळेवर मदत मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. कर्ज काढून पेरणी करायची आणि नंतर निसर्गाचे दृष्टचक्रात व रोगराई मुळे पिके उद्ध्वस्त होतात, असा अनुभव शेतकºयांसाठी नित्याचाच झाला आहे. नुकसान झालेल्या शेतकºयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्याची गरज आहे.(तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरagricultureशेतीFarmerशेतकरी