शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

बोगस महा ई-सेवा केंद्र शासनाच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 18:47 IST

आपले सरकार सेवा केंद्राची होणार पडताळणी, २० जुलैपर्यंत द्यावा लागणार करारनामा 

ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र धारकांची पडताळणी करण्यात येत असून, त्याकरिता विविध नियम व अटींचा करारनामा आपले सरकार सेवा (महा ई सेवा) केंद्र चालकांना २० जुलैपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे द्यावा लागणार आहे. बोगस महा ई सेवा केंद्र चालक शासनाच्या रडारवर असल्याने आॅनलाईन कागदपत्रासाठी जादा पैसे आकारणे, वेळेवर काम न करणे यासारखे नागरिकांची फसवणूक करणा-या महा ई सेवा केंद्र चालकांना आळा बसणार आहे. विविध प्रमाणपत्र एका क्लिकवर आॅनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने ‘आपले सरकार’ प्रणाली उपलब्ध केलेली आहे. तसेच महा ई सेवा केंद्रावर  सुद्धा आॅनलाईन प्रमाणपत्र देण्याची सुविधा आहे. जिल्ह्यात एकूण ३३० महा ई सेवा केंद्र व ६७५ ग्रामपंचायतमधील आपले सरकार सेवा केंद्र असे एकूण १ हजार ५ आपले सरकार सेवा केंद्र कार्यरत आहेत. या केंद्रामधून महसूल विभागाच्या सर्व सेवा उपलब्ध आहेत. ही आपले सरकार सेवा केंद्र गावपातळीवरसुद्धा कार्यान्वीत आहेत. जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा (महा ई सेवा) केंद्रधारकांसाठी पडताळणी मोहीम जिल्हाधिकारी कार्यालाच्या सेतू विभागांतर्गत राबविण्यात येत आहे. त्यासाठी आपले सरकार सेवा (महा ई सेवा) केंद्र धारकांना २० जुलैपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेतू विभागाकडे माहिती द्यावी लागणार आहे. सर्व महा ई सेवा केंद्रधारकांकडून करारनामा लिहून घेतला जाणार आहे. मात्र या करारनाम्यातील नियम व अटी पूर्ण न करणाºयांवर कारवाई होणार आहे. अनेक महा ई सेवा केंद्रधारक प्रमाणपत्र देण्यासाठी जादा पैसे आकारतात, वेळेवर प्रमाणपत्र उपलब्ध करून देत नाहीत, यामुळे सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक होते. अशा बोगस महा ई सेवा केंद्रधारकांचे पितळ उघडे पडणार असून सर्व शासकीय सेवेचे दरपत्रक तसेच सेवेचा कालावधी याचे फलक केंद्रावर लावावे लागणार आहे. परिणामी सर्वसामान्यांची फसवणूक करणाºया बोगस महा ई सेवा केंद्रधारकांवर अंकुश बसणार आहे. 

अन्यथा महा ई सेवा केंद्र बंद!विविध नियम व अटींनी भरलेला करारनामा महा ई सेवा केंद्रधारकांनी मुदतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात दिला नाही तर ते महा ई सेवा केंद्र अस्तित्वात नाही, असे समजले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्याचबरोबर माहिती सादर न करणाºया महा ई सेवा केंद्राना बंद करण्यात येणार आहे. 

केंद्रचालकांना पाळावे लागणार नियम महा ई सेवा केंद्रधारकांसाठी जिल्हास्तरीय सेतू विभागाने अनेक नियम व अटी घालून दिल्या आहेत. त्यामध्ये शासानाने ठरवून दिलेले दर आकारणे, केंद्रावर दरपत्रक लावणे, कायद्याचा भंग होणार नाही, अत्यावश्यक कारणांसाठी २४ तास सेवा देणे, शासनाच्या वेळोवेळी केलेल्या अटींचे पालन करणे, माहिती चुकीची आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करणे, केंद्र धारक शासकीय किंवा निमशासकीय सेवेत रुजू नसावा यासारख्या विविध नियमांचा समावेश आहे. 

आपले सरकार सेवा (महा ई सेवा) केंद्रधारकांना २० जुलैपर्यंत सर्व माहिती कागदपत्रांसह द्यावी लागणार आहे. त्यासाठी केंद्रधारकांना करारनामा उपलब्ध करून देण्यात आला असून माहिती सादर न करणाºयांचे केंद्र बंद करण्यात येतील. - ललीत वराडे,निवासी उपजिल्हाधिकारी, बुलडाणा.