शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दोन चिमुकल्यांसह विवाहीतेचा मृतदेह विहीरीत आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 16:27 IST

दोन चिमुकल्यांसह एका महिलेचा मृतदहे विहीरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्कदुसरबीड:सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड येथे एका विहीरीत दोन चिमुकल्यांसह एका महिलेचा मृतदहे विहीरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.  १९ मे रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली.दरम्यान, प्राथमिक माहितीच्या आधारावर किनगाव राजा पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली असून मृतांचे पार्थिव हे सिंदखेड राजा येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.मृत महिला व तिचे ११ व नऊ वर्षीय मुलगा गणेश आणि मुलगी मयुरी हे १७ मे पासून बेपत्ता होते. ते दुसरबीड येथील रहिवाशी आहेत. १७ मे रोजी स्वाती अमोल जगदाळे (२८) हीने मध्यरात्री दरम्यान मुलगा गणेश व मुलगी मयुरी यांना शौचासाठी घरातून बाहेर नेले होते. बराच वेळ झाला तरी ते परत आले नाहीत. त्यामुळे स्वाती जगदाळेच्या कुटुंबियांनी त्यांचा रात्रभर शोध घेतला परंतू ते सापडले नाहीत. १८ मे रोजीही परिसरात कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला मात्र ते सापडले नाही. दरम्यान १९ मे रोजी  सकाळी साडेसहाच्या सुमारास दुसरबीड गावानजीक मेहकर मार्गाला लागून असलेल्या एका सार्वजनिक विहिरीत तिघांचेही मृतदेह आढळून आले.  याची माहिती मिळताच गावात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर किनगाव राजा पोलिसांनीही घटनास्थळ गाठून पंचनामा करत तिघांचेही पार्थिव सिंदखेड राजा येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले आहेत.प्रकरणी मृत महिलेचा पती अमोल भगवान जाधव याने किनगाव राजा पोलिसांत तक्रार दिली असून त्यावरून पोलिसांनी प्राथमिक माहितीच्या आधारावर आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSuicideआत्महत्या