शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

भिक्षा मागणाऱ्या ‘त्या’ आजीला नांदुऱ्यात मिळाली  ‘दृष्टी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 10:31 IST

Blind Old women get eye sight आत्मसन्मान  फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी तिच्या डोळ्याची मोफत शस्त्रक्रिया स्थानिक नेत्रालयाच्या सहकार्याने केली.

- सुहास वाघमारे लोकमत न्यूज नेटवर्क नांदुरा : लॉकडाऊनच्या काळात एक वयोवृद्ध भिक्षा मागणारी दृष्टीने अधू झालेल्या महिलेच्या डोळ्याची शस्त्रक्रीया करून तीला नवी  दृष्टी दिली. त्यामुळे ही रंगबिरंगी दुनिया पुन्हा या वृद्ध महिलेस पहावयास मिळत आहे. जळगाव खांदेश जिल्ह्यातील बोदवड  परिसरात सामाजिक कार्य करणाऱ्या आत्मसन्मान  फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी तिच्या डोळ्याची मोफत शस्त्रक्रिया स्थानिक नेत्रालयाच्या सहकार्याने केली.घरोघरी फिरत असताना दिसत नसल्याने ही वृध्द महिला नालीत पडली होती. ही बाब आत्मसम्मान   फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या  लक्षात आली.  त्यांनी प्राथमिक तपासणी साठी बोदवड मधील  नेत्र तपासणी सेंटर येथे त्यांच्या डोळ्याची  तपासणी केली. तिथून शस्रक्रियेसाठी नांदुरा नेत्रालय येथे पाठवण्यात आले. तेथे मोफत मोतीबिंदू शस्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी डॉक्टरांनी व येथील कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.  जेवण,  राहण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.याबाबत नेत्रालयाचे चेअरमन व कर्मचाऱ्यांनी अशा असहाय्य व्यक्तींची मदत करण्याचा उद्देश यानिमित्ताने सफल झाल्याची भावना व्यक्त केली. यापुढेही ही कामे करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे.

आजीच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून आनंद शस्रक्रियेनंतर त्या महिलेला दिसू लागले. आता त्या कुणाचाही आधार न घेता चालू शकतात. नवीन दृष्टी मिळाल्यानंतर महिलेच्या चेहऱ्यावरचा आनंद हा पाहण्यासारखा आहे.  याबाबत मोहनराव नारायणा नेत्रालयाचे चेयरमन म्हणाले वृद्धेला नेत्रालयात आणले तेव्हा त्यांना काहीच दिसत नव्हते, शस्रक्रियेनंतर आजीच्या चेहऱ्यावरील आनंद व हास्य पाहून आनंद झाला. आजींना  पुन्हा दृष्टी मिळून देण्यासाठी मोहनराव नारायणा नेत्रालयाची टीम  व आत्मसम्मान­च्या प्रतिनिधींनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :Nanduraनांदूराbuldhanaबुलडाणा