लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर: वीज तारांचा स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना ५ सप्टेंबरला पहाटे उघडकीस आली. अंबाबरवा अभयारण्यातील अस्वल हे बर्याच दिवसांपासून टुनकी, वसाडी परिसरात भटकत होते. ६ वर्षीय नर जातीचे अस्वल ४ स प्टेंबरच्या मध्यरात्री जळगाव जामोद वनपरिक्षेत्रातील वसाडी बिट अं तर्गत येत असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील टुनकी-वसाडी रस् त्यावरील बळीराम नारायण पोपळे यांच्या गट नं. ४६७ या शेतातील निंबाच्या झाडावर चढले होते. याच निंबाच्या झाडाला मधाचे पोळ लागले होते. त्यामुळे मध खाण्यासाठी हे अस्वल निंबावर चढले होते, असा अंदाज वनाधिकार्यांनी वर्तविला आहे. दरम्यान, हे मध खाण्यासाठी निंबाच्या झाडावर चढत असताना निंबाच्या झाडाजवळून जाणार्या विद्युत तारांना या अस्वलाचा स्पर्श झाला व अस्वल निंबाच्या झाडावरून खाली पडले व त्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असा अंदाज सोनाळा वनपरिक्षेत्र अधिकारी काझी यांनी वर्तविला आहे.
विजेच्या धक्क्याने अस्वलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 00:50 IST
संग्रामपूर: वीज तारांचा स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना ५ सप्टेंबरला पहाटे उघडकीस आली.
विजेच्या धक्क्याने अस्वलाचा मृत्यू
ठळक मुद्देमध खाण्यासाठी चढले होते झाडावरवीज तारांचा स्पर्श झाल्याने लागला विजेचा धक्का जळगाव जामोद वनपरिक्षेत्रातील वसाडी बिटमधील घटना