शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

काळी-पिवळी व एसटीची धडक; १७ जखमी

By admin | Updated: June 24, 2017 05:33 IST

मेहकर-चिखली मार्गावर बाभुळखेड फाट्याजवळ अपघात घडला.

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : प्रवाशांनी भरलेल्या काळीपिवळीच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने, काळीपिवळीने समोरुन येणार्‍या एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात १७ प्रवाशी जखमी झाले आहेत. यामध्ये काळीपिवळीतील ११ तर एसटीतील ६ प्रवाशांचा समावेश आहे.काळीपिवळीचा चालक गंभीर असल्यामुळे त्याला औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. मेहकर-चिखली मार्गावर बाभुळखेड फाट्याजवळ २३ जून रोजी सकाळी १0.३0 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. मेहकर-चिखली मार्गावर काळीपिवळी या प्रवाशी वाहतूक करणार्‍या वाहनात नेहमीच चढाओढ असते. प्रवाशी मिळविण्याच्या नादात चालक वेगाच्या सर्व र्मयादा ओलांडतात. सकाळी प्रवाशांनी खचाखच भरलेली काळीपिवळी क्र. एम.एच. २८ -७९५ ही चिखलीवरुन मेहकरकडे येत असतांना, काळीपिवळीच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने काळीपिवळी समोरुन येणार्‍या एसटी बस क्र. एम.एच.४0 - ९९४७ वर जोरदार धडकली. या अपघातात काळीपिवळीचा समोरील भाग चकनाचूर झाला आहे. काळीपिवळीतील चालकासह समोर बसलेले प्रवाशी गंभीर जखमी झाले. काळीपिवळी मधील राजु लाकडे, सुनिल लाकडे (३१), वंदना सुनिल लाकडे (२७), अश्‍विनी सुनिल लाकडे (0४), अर्चना राजु लाकडे (४५) सर्व रा.गजरखेड, सज्रेराव गवई (४५) रा.चंदनपूर, रामप्रसाद मुंडकुळे (६0) पिंपळगाव उंडा, भागवत मुंडकुळे, रुख्मीना दामोधर मुंडकुळे (७0) दोघे रा.पिंपळगाव उंडा हे जखमी झाले आहेत. काळीपिवळी चालक किशोर प्रल्हाद सोनटक्के (३२) रा.मेहकर व धमेंद्र मधुकर नवले (२५) गजरखेड हे दोघे गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. एसटी बसमधील गणेश बा. जाधव देऊळघाट, संभाजी मरीबा कांबळे (६५) रा.मालेगाव, माधुरी राजधर सुरडकर (३0) एस.टी.वाहक रा.बुलडाणा, गणेश संपत इंगळे (४0) रा.हिवराआश्रम, हिराबाई बाबुराव देशमुख (८0) रा.देऊळघाट, अरुणा बाबुराव देशमुख (५५) रा.माळविहिर ता.बुलडाणा हे जखमी झाले आहेत. काही जखमींना स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचारानंतर खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.