शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
3
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
4
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
5
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
6
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
7
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
8
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
9
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
10
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
11
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
12
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
13
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
14
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
15
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
16
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
17
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
18
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
19
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
20
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”

दानवेंना शेगावात दाखविले काळे झेंडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 01:38 IST

 भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकर्‍यांबाबत केलेल्या विधानाचा विरोध आणि निषेध अजूनही थांबलेला नाही. गुरुवारी बुलडाणा जिल्ह्यातील शेगावात ते भाजपाच्या एका कार्यक्रमात पोहोचले असता, तेथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यक्रमस्थळी पोहोचून ‘दानवे गो बॅक’ च्या घोषणा दिल्या, एवढेच नव्हे तर काळे झेंडेसुद्धा दाखवले.

ठळक मुद्दे‘दानवे गो बॅक’ च्या घोषणा१२ कार्यकर्ते ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव  :  भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकर्‍यांबाबत केलेल्या विधानाचा विरोध आणि निषेध अजूनही थांबलेला नाही. गुरुवारी बुलडाणा जिल्ह्यातील शेगावात ते भाजपाच्या एका कार्यक्रमात पोहोचले असता, तेथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यक्रमस्थळी पोहोचून ‘दानवे गो बॅक’ च्या घोषणा दिल्या, एवढेच नव्हे तर काळे झेंडेसुद्धा दाखवले. पोलिसांनी याप्रकरणी १२ काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक केली असून, काळे झेंडेसुद्धा जप्त करण्यात आले. काही दिवसांपूर्वी भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांनी नेहमी रडतात साले, असे बळीराजाबद्दल गैर उद्गार काढले होते. यानंतर दानवे हे आज शेगाव येथे भाजपा महिला आघाडीच्या राज्यस्तरीय बैठकीला उपस्थित झाले.     याची माहिती शेगाव येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी दुपारी १२ वा. खामगाव रोडवरील हॉटेल विघ्नहर्ता या कार्यक्रम स्थळी पोहोचून तेथे ‘दानवे गो बॅक’ च्या घोषणा दिल्या. शिवाय काळे झेंडेही दाखवले. दरम्यान, दानवेंच्या कार्यक्रमात विघ्न आणण्याबाबत पोलिसांना आधीच सूचना मिळाल्याने पोलिसांनी कार्यक्रम स्थळावर कडक बंदोबस्त ठेवला होता, त्यामुळे आंदोलनकर्त्यांना सभा सुरू असलेल्या स्थळापयर्ंत जाता आले नाही.यावेळी ठाणेदार डी.डी.ढाकणे, पीएसआय फटींग, शेख, पोहेकंॅा अरुण खुटाफळे व त्यांच्या पथकाने आंदोलनकर्ते  अमित जाधव, अनिल सावळे, डॉ ताहेर, संतोष सानप, सिद्धार्थ वाकोडे, तौसिफ खान, केशव मेंटकर, उमेश हिवराळे, शुभम आजाडीवाल, आकाश पहुरकार आणि त्यांच्या १२ साथीदारांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करून दानवेंचा  कार्यक्रम संपेपयर्ंत सर्व आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले होते.