शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

कृषी मंत्र्यांना दाखविले काळे झेंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:12 IST

मेहकर: महाराष्ट्राचे कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर हे शेतकरी संवाद कार्यक्रमासाठी बेलगाव येथे जात असताना बेलगाव येथील महामार्गात जमिनी जाणार्‍या शेतकर्‍यांनी एक प्रकल्प एक दर द्यावा, अन्यथा समृद्धी महामार्ग रद्द करावा, यासाठी रस्त्यात उभे राहून घोषणाबाजी करीत गाडीतून जाणार्‍या कृषी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: महाराष्ट्राचे कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर हे शेतकरी संवाद कार्यक्रमासाठी बेलगाव येथे जात असताना बेलगाव येथील महामार्गात जमिनी जाणार्‍या शेतकर्‍यांनी एक प्रकल्प एक दर द्यावा, अन्यथा समृद्धी महामार्ग रद्द करावा, यासाठी रस्त्यात उभे राहून घोषणाबाजी करीत गाडीतून जाणार्‍या कृषी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला.२२ ऑक्टोबरला भाजप किसान आघाडीच्या वतीने बेलगाव येथे शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी १.३0 वाजताच्या दरम्यान भाऊसाहेब फुंडकर यांचा ताफा बेलगाव येथे जात असताना  महामार्गात जमिनी जणारे शेतकरी रितेश वानखेडे, परशराम वानखेडे, दत्तात्रय वानखेडे, महेश बाजड, ज्ञानेश्‍वर वानखेडे, गोपाल वानखेडे यांनी एक प्रकल्प एक दर द्यावा, अन्यथा  महामार्ग रद्द करावा, आम्ही महामार्गासाठी जमिनी देणार नाही अशी घोषणाबाजी करीत कृषी मंत्र्यांना काळे झेंडे दाखविले. या अगोदरही याच शेतकर्‍यांनी महामार्गासाठी जमिनी देणार नाही, म्हणून रक्ताभिषेक करून पंतप्रधान व मुख्यमंत्री यांची पूजा केली होती. सोबतच आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी संघर्ष चालूच ठेवू, असे भ्रमणध्वनीवरून शेतकर्‍यांनी सांगितले होते,  तर बेलगाव येथे महामार्गात २४ शेतकर्‍यांची जवळपास ८0 एकर जमीन जात असून,  या शेतकर्‍यांना सदर जमिनीचा योग्य मोबदला शासनाकडून मिळत नसल्याने शेतकर्‍यांनी निषेध व्यक्त केला. 

टॅग्स :Bhausaheb Phundkarभाऊसाहेब फुंडकर