शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर भाजप गप्प - वामनराव चटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:31 IST

बुलडाणा : वेगळ्य़ा विदर्भाच्या मुद्द्यावर भाजपच्या काही नेत्यांनी आमच्या सोबत आंदोलने केली. निवडणुकीत हा मुद्दा बनवला होता. मात्र आता या मुद्यावर भाजप सोयीस्करपणे गप्प आहे. परंतू वेगळा विदर्भ घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, अशी भूमिका विदर्भ राज्य आंदोलन समितीचे वामनराव चटप यांनी येथे केले.

ठळक मुद्देबुलडाण्यात गुरुवारी पार पडलेल्या पत्रपरिषदेत चटप यांचा भाजपला टोला

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : वेगळ्य़ा विदर्भाच्या मुद्द्यावर भाजपच्या काही नेत्यांनी आमच्या सोबत आंदोलने केली. निवडणुकीत हा मुद्दा बनवला होता. मात्र आता या मुद्यावर भाजप सोयीस्करपणे गप्प आहे. परंतू वेगळा विदर्भ घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, अशी भूमिका विदर्भ राज्य आंदोलन समितीचे वामनराव चटप यांनी येथे केले.गुरूवारी बुलडाणा येथील पत्रकार भवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी राम नवले, बार कॉन्सीलचे अध्यक्ष राज देवकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधीर चेके पाटील, सुरेश वानखेड, दामोदर शर्मा, बाबुराव नरोटे, रंजना मार्मडे, नामदेवराव जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी बोलताना वामनराव चटप म्हणाले की २८ सप्टेंबर १९५३ राजी नागपूर कररा झाला होता. विदर्भाला त्यावेळी महाराष्ट्रात जनतेची संमती न घेता सामिल केले होते. तेव्हापासून विदर्भावर अन्याय होत आहे. या करारानुसार २३ टक्के नोकर्या वैदर्भीय तरुणांना देणे आवश्यक होते. पंरतू प्रत्यक्षात आठ टक्केच दिल्या गेल्या. पश्‍चिम महाराष्ट्रात सर्वाधिक दिल्या गेल्या. यासह अन्य मुद्द्यांचा वामनराव  चटप यांनी उहापोह केला. सरकाली तिजोरीतील एक लाख कोटी रुपये विदर्भाच्या वाट्याचे असताना  पश्‍चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी ते पळविले म्हणून विदर्भात शेती सिंचनाचा अनुशेष आहे. केवळ १७ टक्केच शेती ओलितीखाली आली आहे. कोल्पापूरमध्ये ते प्रमाण ९५ टक्के आहे. पुण्यात १00 टक्के आहे. पश्‍चिम महाराष्ट्र हिरवागार तर विदर्भ कोरडा अशी स्थिती निर्माण झाली आहे. १८ हजार किमी रस्त्यांचाही अनुशेष आहे. त्याचेही ५0 हजार कोटी रुपये पश्‍चिम महाराष्ट्राने पळवल्याचे ते म्हणाले. प्रत्येक मुद्द्यावर उहापोह करून त्यांनी महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास शक्य नसल्याची भूमिका या पत्रकार परिषदेत मांडली. वीज प्रश्नाचाही मुद्दा त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

टॅग्स :Wamanrao Chatapवामनराव चटपbuldhanaबुलडाणा