शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

जिनिंग मालकांचे पणनकडे कोट्यावधी थकीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 13:10 IST

Cotton Purchasing News कोट्यवधी रुपये पणन महासंघाकडे एक वर्षापासून थकल्याने जिनिंग व्यवसाय आर्थिक संकटात आला आहे.

ठळक मुद्देराज्यात ११ व १२ रोजी जिनिंग बंद ठेवण्यात येणार आहे.त्यामुळे दोन दिवस कापूस खरेदीही बंद राहणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव  : गतवर्षी सन २०१९-२० च्या कापूस हंगामात शासकीय कापूस खरेदीच्या कापूस प्रक्रिया, हमाली, वाहतूक याबद्दलचे जिनिंग चालकांचे कोट्यवधी रुपये पणन महासंघाकडे एक वर्षापासून थकल्याने जिनिंग व्यवसाय आर्थिक संकटात आला आहे. पणन महासंघाच्या धोरणाविरुद्ध संपूर्ण राज्यात ११ व १२ रोजी जिनिंग बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे दोन दिवस कापूस खरेदीही बंद राहणार आहे. गतवर्षी कोरोना व लॉकडाऊनमुळे सर्व आर्थिक व्यवहार बिघडले. लॉकडाऊनमुळे हंगामात कापसाची खरेदी उशिरा म्हणजे मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात सुरू करण्यात आली. त्यावेळी शासनाने जिनिंग मालकांना १५ ऑगस्टपर्यंत कापूस खरेदी करण्यास भाग पाडले म्हणून शासनास तोटा झाला. जिनिंगवर शासकीय दराने खरेदी केलेल्या कापसातून रुई व सरकी वेगळी करून गठाण पॅकिंग करून मालवाहू वाहनात भरून देण्यात येते. त्याचा सर्व खर्च पणन महासंघ अदा करते.  त्यापोटी  पणन महासंघाकडे कोटट्यवधी रुपये थकीत आहेत. ही रक्कम देण्यात यावी,  यासाठी पणनमंत्री व कार्यकारी संचालक यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे; परंतु काहीच उपयोग झाला नाही. अगोदरच कोरोनामुळे जिनिंगची आर्थिक परिस्थिती बिघडलेली असताना २०-२१ च्या कापूस हंगाम सुरू कसा करायचा, असा प्रश्न चालकांचा होता. त्यामुळे केंद्र सुरू करण्यास नकार देऊन बहिष्कार घातला होता.  महासंघाने थकीत रक्कम तर दिलीच नाही,  उलट काही जिनिंग चालकांकडून बँक गॅरंटी म्हणून १०-१२ लाख रुपयांचे धनाकर्ष घेण्यात आले. या प्रकाराचा निषेध म्हणून लाक्षणिक आंदोलन केले जात असल्याचे पत्रकातून कळवण्यात आले आहे. 

अन्यायकारक वसुली शासनाने तातडीने थांबवावी. सोबतच एमएक्यु दर्जाचा कापूस घेण्याऐवजी सर्वच ग्रेडचा कापूस खरेदी करण्याची व्यवस्था करावी.- डॉ. किशोर केला, प्रतिनीधी महाराष्ट्र जिनर्स असोसिएशन, जि.बुलडाणा

टॅग्स :khamgaonखामगावcottonकापूस