शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘बीएचआर’चे ठेवीदार सैरभैर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:00 IST

खामगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी सहकारी पतसंस्थेत अनेक ठेवीदारांच्या लाखो रुपयांच्या ठेवी अडकलेल्या असून, सदर ठेवी परत मिळण्यासंदर्भात कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे ठेवीदार आर्थिक अडचणीत सापडल्याने त्यांची अवस्था सैरभैर झाल्याचे दिसत आहे. या ठेवी परत मिळण्याची आशा ठेवीदार बाळगून आहेत.

ठळक मुद्देलाखो रुपयांच्या ठेवी अडकल्यठेवीदार अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी सहकारी पतसंस्थेत अनेक ठेवीदारांच्या लाखो रुपयांच्या ठेवी अडकलेल्या असून, सदर ठेवी परत मिळण्यासंदर्भात कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे ठेवीदार आर्थिक अडचणीत सापडल्याने त्यांची अवस्था सैरभैर झाल्याचे दिसत आहे. या ठेवी परत मिळण्याची आशा ठेवीदार बाळगून आहेत. बीएचआर पतसंस्थेत अनेक ठेवीदारांनी लाखो रुपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या; परंतु सुमारे दोन वर्षांपूर्वी या पतसंस्थेत काळ्या पैशांचे व्यवहार झाल्याचे आढळून आले. त्यामुळे ही पतसंस्था अडचणीत येऊन बंद पडली आहे. दरम्यान, या पतसंस्थेच्या अध्यक्षांसह सर्व संचालकांविरुद्ध दाखल तक्रारीवरून सर्वांना अटक करण्यात आलेली असून, मागील काही महिन्यांपासून सर्व संचालक कारागृहातच आहेत. त्यांना अद्याप जामीन मिळालेला नाही;  मात्र या पतसंस्थेत लाखो रुपयांच्या ठेवी ठेवणारे ठेवीदार अडचणीत सापडले आहेत. दरम्यान, जळगाव येथील बीएचआरचे मुख्य कार्यालय वगळता  सर्व शाखा कार्यालये गुंडाळण्यात आलेली आहेत. त्यामुळे आपल्या ठेवी परत मिळण्यासाठी ठेवीदार जळगाव येथे चकरा मारीत असून, अनेकजण आर्थिक अडचणीत सापडल्याचे दिसून येते. या पतसंस्थेच्या ठेवीदारांनी संघटना स्थापन करून आंदोलनही केले होते; परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. आता सर्व संचालक कारागृहात असल्याने ठेवीदारांचा आंदोलनाचा मार्गही बंद झाला आहे. त्यामुळे हे ठेवीदार सध्या पैशांअभावी विविध अडचणींचा सामना करताना दिसतात.

मी पाठीच्या दुखण्यामुळे त्रस्त होऊन १५ वर्षांपूर्वी नोकरीचा राजीनामा दिला. त्यावेळी मिळालेल्या प्रॉव्हिडंट फंडाच्या रकमेतील तीन लाख रुपये बीएचआर पतसंस्थेत ठेवले होते. त्यावरील व्याजावर आपली म्हातारपणात गुजराण होईल, असे वाटले होते; परंतु ही पतसंस्था बंद झाल्याने व्याज व मूळ रक्कम अडकली असून, बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतो.- सुरेश सोनी, एक ठेवीदार, खामगाव.