शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

भिंगारा, चाळीसटापरी, गोमाल या गावांचा मतदानावर बहिष्कार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 18:34 IST

जळगाव जामोद :  स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या ७२ वर्षात रस्ता, आरोग्य, शिक्षण, उर्जा आदी भौतीक सुविधा प्राप्त न झाल्याने जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी ग्राम भिंगारा, चाळीसटापरी व गोमाल या गावातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला.

- नानासाहेब कांडलकरलोकमत न्यूज नेटवर्क जळगाव जामोद :  स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या ७२ वर्षात रस्ता, आरोग्य, शिक्षण, उर्जा आदी भौतीक सुविधा प्राप्त न झाल्याने जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी ग्राम भिंगारा, चाळीसटापरी व गोमाल या गावातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला. या गावातील एकाही मतदाराने मतदान केले नाही. एक महिन्यापुर्वी म्हणजे १९ मार्च रोजी या गावातील सरपंच व नागरीकांनी उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांना विविध समस्यसांबाबत निवेदन देवून मतदानावर बहिष्काराबाबत सुतोवाच केले होते.भिंगारा व गोमाळ येथे लाखो रूपयाचा निधी खर्च करून इंधनावर चालणारा उर्जा प्रकल्प शासकीय निधीतून उभारण्यात आला. परंतु या प्रकल्पातून एक युनिटही उर्जा बाहेर आली नाही. परिणामी संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तीन खुटी ते भिंगारा या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचा निधी खर्च झाला. परंतु रस्ता बनलाच नाही. याचीही चौकशी व्हावी आणि तीन खेटी ते भिंगारा ते चाळीसटापरी ते गोमाल असा रस्ता तयार व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांची आहे. चाळीसटापरी व गोमाल येथे पिण्याचे पाण्याची भीषण टंचाई असून प्रशासनाने त्यावर उपाययोजना करावी, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीवर लाखोचा खर्च झाला. परंतु तेथे वैद्यकीय अधिकारी नसल्याने ती इमारत शोभेची वस्तु बनली आहे. नियमीत वैद्यकीय अधिकारी देण्यात यावा, ही सुध्दा ग्रामस्थांची मागणी आहे.शेत जमिनीचे पट्टे नियमाप्रमाणे आदिवासी बांधवांना वितरीत करावे. शाळा इमारतीच्या बांधकामात झालेला भ्रष्टाचार शोधून दोषींवर कारवाई करावी. या मागण्यांचा सुध्दा समावेश आहे. म्हणजेच आरोग्य, पाणी, रस्ता, शिक्षण, वीज व शेतजमीन पट्टे या मुख्य मागण्यांसाठी भिंगारा, चाळीसटापरी व गोपाल या तीन गावातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला. आणि तो एकजुट कायम राखीत यशस्वी करून दाखविला.

 गत दोन निवडणुकीत ७० टक्के  मतदान!सन २००९ च्या लोकसभा निवडणुकीत भिंगारा मतदान केंद्रावर ६२.७८ टक्के मतदान झाले होते. तर सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ७०.७८ टक्के मतदान करून या गावातील मतदारांनी मतदान प्रक्रियेत मोठा सहभाग नोंदविला होता. यावेळी भिंगारा (मतदान केंद्र क्रमांक ३) या मतदान केंद्रावर एकुण ११७६ मतदारांची नोंद करण्यात आली आहे. परंतु यापैकी एकाही मतदाराने मतदान केले नाही. गोमाल गावाचे मतदान केंद्र क्र. ४ वर (कुंवरदेव) येथे आहे. परंतु या गावातील मतदारांनी सुध्दा मतदान केले नाही. आपली एकजुट कायम ठेवली. या बहिष्कारानंतर तरी या गावांकडे प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले जाईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांना आहे. विशेष म्हणजे भिंगारा व चाळीसटापरी या गट ग्रामपंचायतीमध्ये रूख्माबाई सुरेश मुझाब्दा या महिला सरपंच आहेत. 

 पुढाºयांना गावबंदी!मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतरही सदर ग्रामस्थांच्या समस्या ऐकुन सोडविण्याच्या दिशेने कोणतेच प्रयत्न होत नसल्याचे पाहून त्यांनी याविषयी आक्रमक पवित्रा घेत १३ एप्रिलपासून पुढाºयांना गावबंदी केली होती. या बंदीचा फलक गावाच्या प्रवेशव्दारावरच लावण्यात आला होता. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbuldhana-pcबुलडाणाJalgaon Jamodजळगाव जामोद