शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

भेंडवळचं भाकीत शेतकऱ्यांची दिशाभूल अन् फसवणूक करणारा प्रकार - अंनिस

By सदानंद सिरसाट | Updated: May 11, 2024 09:56 IST

बुलडाणा जिल्ह्यातून दरवर्षी जाहीर होणाऱ्या भेंडवळच्या घटमांडणीची पंरपरा आहे. ही घटमांडणी सुमारे ३७० वर्षांहून अधिक जुनी परंपरा आहे.

खामगाव (बुलढाणा) - बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवडची घटमांडणी शेतकऱ्यांची निव्वळ  दिशाभूल व फसवणूक करणारा प्रयोग आहे. लीळावती विद्येचा दावा खोटा असून ही विद्या सिद्ध करणाऱ्यास अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून २५ लाख रुपये व २५ लाख रुपये वैयक्तिक असं ५० लाखांचे बक्षीस अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक रघुनाथ कौलकर यांनी जाहीर केले आहे.

बुलडाणा जिल्ह्यातून दरवर्षी जाहीर होणाऱ्या भेंडवळच्या घटमांडणीची पंरपरा आहे. ही घटमांडणी सुमारे ३७० वर्षांहून अधिक जुनी परंपरा आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बुलडाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवळ गावात होणारी घटमांडणी विदर्भातीलच नव्हे तर राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्यासाठी पर्जन्यमान आणि पिकांच्या स्थितीवर अंदाज वर्तवते. 

शेतकऱ्यांचा भेंडवळ घटमांडणीवर  विश्वास आहे. दरवर्षी या मांडणीचे भाकित ऐकण्यासाठी हजारो शेतकरी उपस्थित असतात. घटमांडणीचे भाकित घेऊन शेतकरी पुढील हंगामाची पेरणी काय करायची, ते ठरवत असतात. पावसाची महिनावार माहिती आणि पीक परिस्थितीचा अंदाजही वर्तवण्यात येतो. अंधश्रद्धा निर्मूलन समिती याला निव्वळ ठोकताळे म्हणत आहे. 

आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक रघुनाथ कौलकर यांनी या घटमांडणीवर आरोप करत त्याला थोतांड म्हटलं आहे. मांडणीच्या माध्यमातून जाहीर केलेली भाकिते अनेकवेळा खोटी ठरलेली आहेत. या घटमांडणीच्या आहारी जाऊ नये, असं, आवाहनही कौलकर यांनी केलं आहे.