शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी महिलांसोबत साजरी केली भाऊबीज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 23:49 IST

जळगाव जामोद : एकविसाव्या शतकाच्या वाटचालीनंतर सुध्दा समाजातील अनेक घटक मुख्य प्रवाहापासून व प्रकाशपर्वापासून दूर आहेत. अशा वंचितांची दिवाळी सारख्या महत्वाच्या सणाला आठवण करुन त्यांच्या वस्त्या व पाड्यांवर जावून दिवाळी-भाऊबिज सारखे सण जेव्हा समाज मान्यता असलेल्या व्यक्ती साजरे करतात तेव्हा वेगळा आदर्श निर्माण होत असतो. 

ठळक मुद्देवंचितांसोबत भाऊबीजेची अकरा वर्षांची परंपरा कायम

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : एकविसाव्या शतकाच्या वाटचालीनंतर सुध्दा समाजातील अनेक घटक मुख्य प्रवाहापासून व प्रकाशपर्वापासून दूर आहेत. अशा वंचितांची दिवाळी सारख्या महत्वाच्या सणाला आठवण करुन त्यांच्या वस्त्या व पाड्यांवर जावून दिवाळी-भाऊबिज सारखे सण जेव्हा समाज मान्यता असलेल्या व्यक्ती साजरे करतात तेव्हा वेगळा आदर्श निर्माण होत असतो. माजी राज्यमंत्री सुबोध सावजी हे असेच एक आगळे व्यक्तीमत्व. गत अकरा वर्षापासून दुर्गम भागात राहणार्‍या आदिवासी महिलांमध्ये जावून हा ‘भाऊ’ भाऊबीज साजरी करतो आणि ओवाळणी म्हणून त्यांना जीवनोपयोगी एखादी वस्तू भेट देतो.शनिवारी भाऊबिजेच्या दिवशी सुबोध सावजी यांनी जळगाव जामोद तालुक्यातील विकासापासून कोसोदूर असलेल्या चाळीसटापरी, मोठे गोमाल व छोटे गोमाल या आदिवासी गावात जावून भाऊबीज साजरी केली. या गावातील सर्व महिलांनी सुबोध सावजी व त्यांच्या समवेत असणार्‍या सर्व प्रतिष्ठितांना परंपरागत पध्दतीने ओवाळले. यावेळी आदिवासी महिलांच्या चेहर्‍यावर हास्य फुलले मनात आनंदाची लहर निर्माण झाली. आणि कोणीतरी दिग्गज भाऊ आपल्या पाठीशी उभा आहे. या भावनेतून जगण्याची हिम्मतही वाढली. सुबोध सावजी यांनी यापूर्वी सायखेड, भिंगारा, जनुना या आदिवासी गावांमध्ये रक्षाबंधन व भाऊबीज साजरी केली आहे. तर अ.भा.काँग्रेस कमिटीचे चिटणीस आ.हर्षवर्धन सपकाळ यांनी चाळीस टापरी व गोमाल या आदिवासी गावात १७ वर्षापासून संपर्क ठेवत वैद्यकीय मदत, अन्नदान व दिवाळी भेट दिली आहे. त्याचीही प्रशंसा हे आदिवासी बांधव मुक्तकंठाने करतात.

ओवाळणीत दिली ब्लँंकेटची भेटचाळीस टापरी व दोन्ही गोमाल येथील सर्व आदिवासी भगिनींना सुबोध सावजी यांनी उलनच्या ब्लॅकेंटची भेट दिली. सुमारे पावणे दोनशे कुटूंबातील भगिनींना या जीवनाश्यक वस्तूची भेट मिळाल्याने या भगिनींसह त्यांच्या कुटुंबीयांच्याही चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. याशिवाय या गावाच्या काही गरजा भागविण्यासाठी सहकार्य करण्याचे अभिवचनही सुबोध सावजी यांनी यावेळी दिले. या नावीण्यपूर्ण भाऊबीजप्रसंगी वा.रा.पिसे, अर्जुन घोलप, अबरार खान मिल्ली, अरुण ताडे, माया धाडे, चंद्रकांत माने, पांडूरंग ताडे, गणेश उमरकर, शमीम देशमुख आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :diwaliदिवाळी