खामगाव : विदर्भातील शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन शेतकर्यांचा सात-बारा कोरा करावा, या आशयाचे निवेदन भारिप-बहुजन महासंघाने उपविभागीय अधिकार्यांना बुधवारी दिले. गेल्या तीन वर्षांंंपासून खामगाव उपविभागातील शेतकरी पावसाच्या अनियमिततेमुळे संकटात सापडले आहेत. त्यामुळे त्यांना जगणे कठीण झाले असून, आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. शेतकर्यांना या जीव घुसमटून टाकणार्या संकटातून वर काढण्यासाठी त्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यासारख्या उपाययोजना करण्याची गरज आहे. अत्यल्प पावसामुळे शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे त्यांना संपूर्ण कर्जमाफीसह दुष्काळ जाहीर करावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देताना तालुकाध्यक्ष अंबादास वानखडे, शहराध्यक्ष संजय शर्मा, दत्ता काळुसे, नीलेश दिपके, राजेश हेलोडे, गणेश हिवराळे, दिनेश कस्तुरे, कैलास मिश्रा, बळीराम इंगळे, अरुण डोंगरे, रमेश गवारगुरू, कैलास इंगोले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
कर्जमाफीसाठी भारिपचे निवेदन
By admin | Updated: July 15, 2015 23:19 IST