शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
6
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
7
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
8
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
9
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
10
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
11
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
12
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
13
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
14
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
15
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
16
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
17
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
18
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
19
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
20
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...

‘सुपर आजी’ ची सायकलने भारत भ्रमंती

By admin | Updated: June 24, 2017 05:34 IST

७0 वर्षीय ‘सुपर आजी’ चक्क सायकलवर खामगाव तालुक्यातून भारत भ्रमंतीला निघाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: जिल्ह्यातील ७0 वर्षीय ह्यसुपर आजीह्ण चक्क सायकलवर खामगाव तालुक्यातून भारत भ्रमंतीला निघाली आहे. आतापर्यंंंत या सुपर आजीने माहूरगड, वैष्णवदेवीपर्यंंंंतचा तब्बल ४,000 किलोमीटरचा प्रवास मागील दोन वर्षात पूर्ण केला असून, यावर्षी वैष्णोदेवीच्या पुढे जाऊन अमरनाथची यात्रा सायकलने पूर्ण करणार आहे. रेखा जोगळेकर असे या सुपर आजीचे नाव असून, त्यांनी एम.ए.बी.एड. पर्यंंंतच शिक्षण घेतले आहे. अगोदरपासूनच संसाराची धुरा सांभाळत जिल्हा परिषदेत तब्बल ३0 वर्ष केंद्रप्रमुख म्हणून कामसुद्धा या सुपर आजीने केले आहे. सेवानवृत्तीनंतर काहीतरी अनोखे करण्याची जिद्द घेऊन या सुपर आजीने गेल्या तीन वर्षांंंंपासून भारत भ्रमंतीचा प्रवास सुरू केला आहे. या वयात काहीतरी हटके करून दाखविण्याची प्रेरणा त्यांच्या आईकडून मिळाली असल्याचे त्या सांगतात. अगदी ७0 व्या वर्षी ठणठणीत दिसणार्‍या सुपर आजीचा आदर्श प्रत्येक नवयुवतींनी घ्यावा, असे त्यांना वाटते. आजच्या स्पर्धेच्या युगात महिलाही कुठे कमी नाहीत, हाच संदेश घेऊन त्यांनी हा भारत भ्रमंतीला निर्धार केला आहे. नाथ प्लॉट खामगाव येथील रहिवासी असलेले योगेश जोगळेकर हे आजीचे एकमेव चिरंजीव आहेत. ते सध्या यवतमाळ येथे एमएसईबीमध्ये ठेकेदारी करतात. रेखा जोगळेकर २१ जून रोजी निघाल्या आणि साधारण २२ जुलैला पोहचणार आहेत. अगदी पावसाळ्याचा सुरुवातीला हा भारत भ्रमंतीला प्रवास सुरू होऊन पुढे अनेक राज्य पार करत आजी दररोज शरीर साथ देईल तितका प्रवास करत असतात व रात्री विश्रांती घेते. प्रत्येक गावात या सुपर आजीचे स्वागत केल्या जाते. ठिकठिकाणी या सुपर आजीला मदतही मिळत असते. त्यामुळे तब्बल २,000 किलोमीटरचा हा सायकल प्रवास आजीबाईला आनंददायी असाच वाटतो. प्रवासाला निघत असताना आजीबाईचे घरात पूजन करण्यात आले व निरोप देण्यासाठी वाजंत्री सोबत वाजतगाजत गावातून पुष्पहार घालून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. ही सुपर आजी कपडे आणि काही ऊन-पावसापासून सुरक्षेचे साहित्य घेऊन भारत भ्रमंतीला निघाली आहे.