संग्रामपूर : तालुक्यातील विविध समस्यांसाठी भारिप-बहुजन महासंघाच्यावतीने विविध समस्यांसाठी आज ६ जून रोजी स्थानिक तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी अतिक्रमण धारकांच्या समस्या, शेतकरी, शेतमजुरांचा त्यांच्या प्रश्नांसाठी भारिप-बमसंने एल्गार पुकारला.सोनाळा गावातील अतिक्रमण हटवून गरीबांच्या घरांचे नुकसान केले त्यांना आर्थिक भरपाई देवून जागेचे कायम पट्टे देण्यात यावे, रमाई घरकुल योजनेचे अनुदान दीड लाख रुपये करण्यात यावे, संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांचे मानधन वाढवून २ हजार रुपये करण्यात यावे, विभक्त कुटुंबांना त्वरित विभक्त रेशनकार्ड देण्यात यावे, शेतकरी शेतमजुरांना मासिक २000 रु. पेन्शन देण्यात यावे, शासकीय कार्यालयातील रिक्तपदे भरण्यात यावी आदी १३ मागण्यांसाठी सदर धरणे आंदोलन होते. यावेळी देविदास दामोदर, तेजराव इंगळे, प्रल्हाद दातार, दशरथ सुरडकर, वसुलकर काका, रवींद्र भेलके, हुसेनभाई, दशरथ लोणकर, वसंतराव पाटील, चेतन पाटील, दिनकरराव दाभाडे, भारत वानखडे, अरुण निंबोळकार, विजय पहुरकर, उत्तम उमाळे, गौतम इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तहसीलदार काझी व नायब तहसीलदार दाभाडे यांनी धरणे मंडपात येऊन आंदोलनकर्त्यांशी मागण्यांबाबत चर्चा केली. मागण्यांबाबत सकारात्मक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या धरणे आंदोलनात संग्रामपूर तालुक्यातील ५00 च्या वर महिला व पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संचालन श्रीराम बांगर यांनी केले.
विविध समस्यांसाठी भारिपचे धरणे
By admin | Updated: June 7, 2014 00:18 IST