शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

आज भेंडवळची घटमांडणी; उद्या होणार अंदाज जाहिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 2:51 PM

जळगाव जामोद: विदर्भातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून असलेल्या सुप्रसिद्ध भेंडवळची घटमांडणी मंगळवारी, ७ मे रोजी संध्याकाळी होत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद: विदर्भातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून असलेल्या सुप्रसिद्ध भेंडवळची घटमांडणी मंगळवारी, ७ मे रोजी संध्याकाळी होत आहे. ८ मेरोजी सकाळी जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे सकाळी ५.३० वाजता अंदाज जाहिर करण्यात येणार आहे. पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या या गावी घटमांडणीची परंपरा सुमारे साडेतीनशे वर्षांपासून सुरू आहे. घटमांडणीचे भाकीत ८ मे रोजी पहाटे चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज हे जाहीर करतील. मंगळवारी अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी गावाबाहेर बस स्टॅन्ड शेजारच्या शेतामध्ये घटाची मांडणी करण्यात येईल. घटामध्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा, मसूर, करडी आदी १८ प्रकारचे धान्य ठेवण्यात येते. गटाच्या मध्यभागी मातीची ढेकळे त्यावर पाण्याने भरलेली घागर,पानसुपारी, पुरी, पापड, खांडोळी, कुरळी हे खाद्यपदार्थही ठेवले जातात. रात्रभर कोणीही या ठिकाणी थांबत नाही. दुसºया दिवशी पहाटे गटांमध्ये झालेल्या बदलावरून त्याचे सूक्ष्म निरीक्षण केल्यानंतर भाकित वर्तवण्यात येते. यावरून शेतकरी पिकांचा आणि पावसाचा अंदाज वर्तवतात. कोणत्या महिन्यात पाऊस जास्त तर कोणत्या महिन्यात पाऊस कमी सांगितला आहे यावरून शेतकरी यंदा कोणत्या पिकाची पेरणी करावी हे ठरवत असतात. चंद्रभान महाराजांच्या वंशजांनी भेंडवड घटमांडणीची परंपरा कायम ठेवली आह.े पुंजाजी महाराज, शारंगधर महाराज आजही ही परंपरा जोपासत असून नियम पाळतात व घटमांडणी करून भाकिते सांगतात. शेतकऱ्यांचा यावर दृढ विश्वास आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा गावातील हनुमान मंदिराच्या पारावर पूर्व मांडणी केली जात. या दोन्हींनी मांडणीमध्ये साम्य असते. त्यामुळे या दोन्ही मांडणीचे निकस एकत्र जोडून हे भाकिते वर्तविली जातात. तेव्हा भविष्यात काय दडले आहे, यावर्षी पाऊस कसा असेल? राजकीय परिस्थिती काय राहील, राजा कोण होईल यासारख्या अंदाजाकडे शेतकºयांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाJalgaon Jamodजळगाव जामोद