शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

‘भगवत गीता दु:खापासून मुक्ती देण्याचे एकमेव साधन!’ -  मदन सुंदरदास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 16:08 IST

मनुष्य  जीवनात पैसा कमविण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत धडपडतो. मात्र, पैसा मिळाल्यानंतर तो आनंद घेवू शकत नाही.

- अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव: जगातले सगळेच धर्म महान आहेत. प्रत्येक धर्म सत्य आणि चांगल्या कमार्चीच शिकवणूक देत असतो. पण मानव त्या धर्माच्या धर्मग्रंथांमधल्या गोष्टींचं योग्य पालन करत नाही, आणि चुकीच्या दिशेनं जाऊ लागतो. चुकीच्या दिशेनं जाणाºया व्यक्तीला घडविण्यासाठी इस्कॉन ही संस्था  प्रयत्नशील आहे. ‘ इस्कॉन’चे मदनसुंदर दास यांच्याशी साधलेला संवाद.

तणावमुक्त समाजासाठी ‘इस्कॉन’च्या प्रयत्नांबाबत काय सांगाल?प्रत्येक मनुष्याच्या जीवनात संकट येत असतात. संकटातून योग्य अर्थ काढला पाहीजे. संकटकाळी बुध्दीचा वापर केल्यास दु:ख आणि गोंधळातूनही मनुष्याला चांगला मार्ग सापडतो. अर्जुनाला दु:ख आणि द्विधा मनस्थितीत मार्गदर्शन करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने भगवत गीता सांगितली. भगवत गीता ही दु:खापासून मुक्ती देण्याचं प्रमुख साधन आहे. हे पटवून देण्यासाठी ‘इस्कॉन’ही संस्था झटत आहे.

समाजात संस्कार रूजविण्यासाठी ‘इस्कॉन’चे योगदान काय ?समाजातील प्रत्येक मनुष्य सुखाच्या शोधात धडपडत आहे. परंतु, खरे सुख कशात आहे, याची जाणिव त्याला नाही. त्यामुळे अनेक मनुष्य आपलं अनमोल आयुष्य व्यर्थ घालवित आहेत. संस्कार आणि नितिमुल्य रुजविण्यासाठी गीता जयंतीच्या पर्वावर देशात एकाचवेळी भगवत् गीतेतील विविध अध्यायांवर आधारीत स्पर्धा घेत, विद्यार्थ्यांमध्ये जाणिव जागृती केली जाते.

भगवत गीतेला विज्ञाननिष्ठ मानता येईल का?  निश्चितच...भगवत गीता केवळ एका धर्माचा ग्रंथ नाही. श्रीमद् भगवत गीतेत कर्मयोग अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. हा कर्मयोग माणसाला विज्ञानाचे माहात्म्य सांगतो. एकीकडे विधात्यावर श्रद्धा ठेवण्याचे आवाहन गीतेत आहे, तर दुसरीकडे विज्ञानवादी दृष्टिकोनाचा अंगीकार करायला शिकवला जातो. त्यामुळे भगवत गीता ही विज्ञाननिष्ठ आहे, असे आपले प्रामाणिक मत आहे. काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, इर्षा हे सहा विकार माणसाला बाहेरून त्रास देतात. तर इच्छा माणसाला आतून त्रास देते. या सहा विकारांच्या ताब्यात गेलेले मन व शरीर निरोगी राहीलच कसे?सहा विकारांवर विजय मिळवणे सोपे नाही. पण आपले मन ताब्यात राहिले. तरच मनावरचा ताण अपोआप हलका होतो.

 ‘इस्कॉन’शी आपण केव्हापासून जुळलात?अमेरिकेतील ओहियो स्टेट विद्यापीठातून इलेक्ट्रीकल आणि कम्प्युटर इंजीनिअरिंगमध्ये मास्टर डिग्री मिळविली. त्यानंतर जुनिपर नेटवर्क, युएसए येथे इंजिनीअरम्हणून काम केले. या कालावधीत सन २०११ मध्ये शोध प्रबंधांसाठी प्रतिष्ठित ‘कर्मचारी उत्कृष्टता पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. दरम्यान, भगवत गीतेतील संदेश आणि इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांच्या जीवनकार्याने प्रेरीत झाल्याने मायदेशी म्हणजे भारतात परत आलो. सन २०१२ मध्ये वैदीक कला आणि विज्ञानाचे पूर्णकालिक विद्यार्थी म्हणून इस्कॉनमध्ये सहभागी झालो. इस्कॉनशी जुळल्यानेच आपल्याला स्व:तची खरी ओळख झाली. त्यामुळे इस्कॉनशी जुळल्याचा मनस्वी आनंद आहे. अज्ञानामुळेच मनुष्य भेदा-भेद पाळत आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावspiritualअध्यात्मिकinterviewमुलाखत