शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सातबाऱ्यावर विहिरीची नोंद नसूनही योजनेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 15:08 IST

३० हजार रुपये किंमत असलेला ठिबक सिंचन संच ९० ते दिड लाख रुपयापर्यंत विकल्या गेल्याची बिले जोडण्यात आली आहेत.

- योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शेतकऱ्यांच्या आर्थीक उन्नतीसाठी एकीकडे शासन विविध कल्याणकारी योजना आखते. मात्र योजनांच्या नावावर अधिकाºयांना हाताशी धरून ठिबक सिंचन योजनेमध्ये आर्थीक लाभासाठी दिशाभूल करीत अनेकांनी लाखोचा मलिदा लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रारी झाल्यानंतरही त्यांनी कुठलीच कारवाई केली नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे.पाण्याची पातळी खोल गेल्याने शेतकºयांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून अनुदानावर प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत ठिबक व स्प्रिंकलर उपलब्ध करून देण्याची योजना राबवली जात आहे. या योजनेमध्ये जिल्हयात मोठ्या प्रमाणात घोळ झाला असल्याचे दिसून येते. प्रधानमंत्री ठिबक सिंचन योजना २०१२- १३ पासून सुरु झाली आहे. ठिबक, तुषार सिंचन करू इच्छिणाºया शेतकºयांसाठी अनुदानतत्वावर ही योजना राबविली जाते. आॅ़नलाईनद्वारे अर्ज केल्यानंतर अनुदान मंजूर झालेल्या शेतकºयाने तालुका कृषी अधिकाºयाची पूर्व संमती मिळाल्यानंतर तालुक्यातील किंवा जिल्हयातील नोंदणीकृत वितरकाकडून ठिबक, तुषार संच बसवायचा असतो. त्यानंतर अनुदानासाठी प्रस्ताव सादर करावयाचा असतो. पात्र शेतकºयांना अनुदान मिळाले नाही मात्र ज्यांनी साटेलोटे करीत एकदा लाभ घेतला असताना परत दुसºया, तिसºया वर्षी सातत्याने लाभ घेतल्याचेही दिसून येते. प्रामुख्याने संग्रामपूर, खामगाव, नांदुरा, जळगाव, मलकापूर तालुक्यात हा प्र्रकार घडल्याची विश्वसनीय माहिती सुत्रांनी दिली. या योजनेसाठी अनेक शेतकºयांनी आॅ़नलाईन अर्ज सादर केले.यापैकी विशिष्ट अनुदानासाठी ट्क्केवारी ठरल्यानंतर काहींचेच पात्र ठरविण्यात आले. कृषी पर्यवेक्षकांनी कार्यालयातच बसून शिवार तपासणी केली. विशेष म्हणजे यासाठी जिओ टॅगिंगने फोटो काढून अपलोड करणे क्रमप्राप्त होते. इंटरनेटची अडचण दाखवत त्यातूनही पळवाट काढण्यात आली. फोटो असल्याशिवाय प्रस्ताव मंजूर केला जाणार नाही ही अट असताना याकडे मात्र तालुका कृषी अधिकाºयांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. यामुळेच अनेक शेतकरी लाभार्थ्यांना हाताशी धरून कृषी विभागातील काही कर्मचारी व अधिकाºयांनी शासनाची दिशाभूल केल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे बाजारभावानुसार ३० हजार रुपये किंमत असलेला ठिबक सिंचन संच ९० ते दिड लाख रुपयापर्यंत विकल्या गेल्याची बिले जोडण्यात आली आहेत. आर्थीक लाभ देणाºया शेतकºयांचे प्रस्ताव निकाली लावून उर्वरीत शेतकºयांना मात्र प्रतिक्षेत ठेवण्यात आले आहे.

आमच्या अधिकाºयांकडून योजनेचा लाभ नियमातच दिला असेल. पण काही ठिकाणी गैरप्रकार झाला असल्यास त्याची चौकशी केल्याशिवाय नेमके सांगता येणार नाही.- नरेंद्र नाईक,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावgovernment schemeसरकारी योजना