शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या लाटेची घंटा वाजली; कौशल्य अवगत मनुष्यबळाचे प्रशिक्षण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 11:49 IST

The bell of the third wave rang : अडचणीवर मात करण्यासाठी कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी कोवीड समर्पीत रुग्णालयात डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही घेण्यात येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: तिसऱ्या लाटेची प्राथमिक जागतिक स्तरावर सुरू झाली असून १११ देशात डेल्टा विषाणू सापडल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. सोबतच प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयस्तरावर प्रसंगी गंभीर रुग्ण आल्यास त्याच्यावर कसे उपचार करावेत तथा यासंदर्भातील अडचणीवर मात करण्यासाठी कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी कोवीड समर्पीत रुग्णालयात डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही घेण्यात येत आहेत. त्यातच दुसऱ्या लाटेदरम्यान बुलडाणा, खामगाव आणि शेगाव येथील कोवीड समर्पीत रुग्णालयांवर मोठा ताण आला होता. तो तिसऱ्या लाटेदरम्यान कमी करण्याच्या दृष्टीने यंत्रणेने नियोजन केले असून ग्रामीण रुग्णालयांमध्ये किमान ३० बेडवर ऑक्सिनज सुविधा उपलब्ध करण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे. दुसऱ्या लाटेत ४९ टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण हे ग्रामीण भागातील होते.  त्यामुळे रुग्णालयांची सुसज्जता वाढविण्यावर भर दिला जात आहे. 

५२२५ बेड्सची सज्जताजिल्ह्यातील कोवीड समर्पीत रुग्णालय, कोवीड हॉस्पीटल, कोवीड केअर सेंटर मिळून ५२५ बेड्सची सज्जता करण्यात आली आहे. यात ४९४ आसीयू अेाटू बेड, १३४५ अेाटू सपोर्टेड बेड, ११४ आसीयू व्हेंटिलेटर बेड आणि अेाटू व्यतिरिक्त ३,२६५ बेडची उपलब्धता करण्याची क्षमता आरोग्य विभागाने निर्माण केली आहे.लहान मुलांसाठी  केअर सेंटरलहान मुलांसाठी खामगाव, बुलडाणा आणि शेगाव येथे प्रत्येकी ५० बेडच्या क्षमतेचे केअर सेंटर उपलब्ध करण्यात येत आहे. हे सर्व बेड ऑक्सिजन युक्त राहणार आहे. यासोबतच ग्रामीण रुग्णालयामध्येही ऑक्सिजन बेडची संख्या वाढविण्यात येत आहे.

१६ ऑक्सिनज प्लांट तयार  प्रसंगी ऑक्सिजनची मागणी २५ मेट्रीक टनापर्यंत गेल्यास १,८५२ जम्बो सिलिंडरच्या माध्यमातून ऑक्सीजनची मागणी पूर्ण करण्यासाठी एक बॅकअप प्लान ही आरोग्य विभागाकडे तयार आहे.   खामगाव व बुलडाणा येथे सिलींडर रिफिलींग करण्यासाठीचेही नियोजन करण्यात आलेले आहे. खासगी व शासकीय मिळून एकूण १६ पीएसए प्लांट जिल्ह्यात सध्या उभारण्यात आले आहेत.

 

संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सज्जता ठेवली आहे. ऑक्सिजनसाठीही आणखी ६ केएल व दहा केएलचा लिक्वीड ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहे. ग्रामीण आरोग्य केंद्रामध्येही ऑक्सिजन उपलब्धतेसाठी ऑक्सिनज पाईपलाईनही टाकण्यात येत आहे.-डॉ. नितीन तडस, जिल्हा शल्यचिकित्क, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या