शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

कचऱ्याच्या ढिगावर बेलाड वासीयांनी केली दिवाळी साजरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 15:36 IST

दिवाळीत लक्ष्मीपूजन हा सर्वात महत्त्वाचा दिवस समजल्या जातो. मात्र कचऱ्यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील बेलाड ग्रामस्थांनी गावाजवळील डम्पिंग ग्राउंड वर दिवाळी साजरी करून शासनाचा निषेध नोंदवला.  

मलकापूर : दिवाळीत लक्ष्मीपूजन हा सर्वात महत्त्वाचा दिवस समजल्या जातो. मात्र कचऱ्यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील बेलाड ग्रामस्थांनी गावाजवळील डम्पिंग ग्राउंड वर दिवाळी साजरी करून शासनाचा निषेध नोंदवला.  

मागील दोन महिन्यापासून बेलाड ग्रामस्थांच्या आरोग्यास धोकादायक असलेलं डम्पिंग ग्राऊंड त्वरित हटविण्यात यावे व झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई त्यांना त्वरित उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी लढाई लढत आहे. याकरिता न. प. प्रशासनाला व तहसीलदारांना वारंवार निवेदने दिली. परंतु प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. 

दिवाळीच्या दिवशी सर्व ग्रामस्थांनी दिवाळी या सणावर बहिष्कार टाकून डंपिंग ग्राउंडवर दिवाळी साजरी केली. या आंदोलनात अन्यायग्रस्त शेतकरी सुनील  संबारे, श्रीकृष्ण संबारे, इच्छाराम संबारे, राहुल संबारे, दीपक चोखंडे, गणेश दहिभाते, सोमेश्वर संबारे, हनुमान भगत, सागर संबारे, गजानन संबारे, दुर्गेश जंगले, सचिन संबारे, पवन संबारे, अमोल संबारे, मनोज संबारे, गणेश संबारे,अनिल केने, प्रशांत संबारे, निलेश संबारे, शिवाजी केने, अमृत संबारे, रामा संबारे यांनी सहभाग घेतला. 

असा दुजाभाव कशासाठी? 

नगराध्यक्ष हरीश रावळ यांनी बेलाड कॉटन मार्केट समोर राहणाऱ्या नाथ जोगी समाजाचे लोक यांना वीजपुरवठा व्हावा याकरिता विद्युत वितरण कंपनीमध्ये दिवाळी साजरी केली. परंतु त्या समाजाच्या लोकांसाठी  विद्युत पुरवठा व्हावा हा प्रश्न जितका महत्त्वाचा आहे. डम्पिंग ग्राऊंड हा त्यांच्यासाठी तितकाच गंभीर प्रश्न आहे. नऊ-दहा 2018 ला नगरपरिषद प्रशासनाला डम्पिंग ग्राउंड विरोधात निवेदन देताना नाथ जोगी समाजाचे लोक उपस्थित होते. नाथ जोगी समाजाचे लोक जिथे राहतात त्यांच्या घराच्या 100 मीटर अंतरावरच हे डम्पिंग ग्राऊंड वसवलेलं आहे. नगराध्यक्ष अॅ. हरीश रावळ या प्रकरणाबाबत दुर्लक्ष का करीत आहे असा प्रश्न यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित केला. 

आरोग्याचा प्रश्नाकडे दुर्लक्ष! 

भराडी लोकांसह बेलाड ग्रामस्थ व इतर आजूबाजूच्या परिसरातील सुमारे पाच हजार लोकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असतानाही हरीश रावळ गप्प का असाही प्रश्न उपस्थित केला आहे. जोपर्यंत आम्हा बेलाड वाशीयांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही कोणताही सण साजरा करणार नाही असे यावेळी ग्रामस्थांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच येत्या दोन-तीन दिवसाच्या आत प्रशासनाने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही प्रशासनाच्या विरोधात विराट एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे.

टॅग्स :Diwaliदिवाळीbuldhanaबुलडाणा