चिखली, दि. २३- राष्ट्रगीताने एक ऊर्जा मिळत असते. शालेय जीवनात विद्यार्थी पहिले राष्ट्रगीत गातात आणि नंतर शिक्षणाची सुरुवात करतात. म्हणून त्यांच्यामध्ये दिवसभर स्फूर्ती असते. असेच जर प्रत्येक कर्मचार्याने केले, तर त्यांच्यात दिवसभर काम करण्याची चेतना राहील. त्यामुळे चिखली पंचायत समितीच्या नविनर्वाचित सभापती संगीता संजय पांढरे यांनी पदभार हातात घेताच राष्ट्रगीताने कामाला सुरुवात केली आहे. तथापि यापुढे रोज सकाळी राष्ट्रगीताने कामाला सुरुवात होईल, असे जाहीर केले आहे.चिखली पंचायत समितीमध्ये नवनिर्वाचित सभापती संगीता संजय पांढरे यांनी २0 मार्च रोजी बैलबंडीने वाजत गाजत कार्यालयापर्यंंत प्रवास करून तेथे मान्यवरांच्या उपस्थितीत अधिकृतपणे पदभार स्वीकारला. त्यानंतर प्रत्यक्ष कामकाजास सुरुवातदेखील केली आहे. दरम्यान, पंचायत समितीकडून एक चांगले आणि शेतकर्यांसाठी पारदर्शक कारभार देणारे प्रतिनिधी पदावर असावेत, या अपेक्षेने जनतेबरोबरच शिवसेना, शेतकरी संघटना, पीरिपा यांनी काँग्रेस पक्षाच्या संगीताताई पांढरे यांना सभापती पदावर निवडून दिले असल्याने ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडताना तसेच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी यांची कामे करण्यात पंचायत समिती प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही, यासाठी त्या आग्रही आहेत. त्यानुषंगाने पंचायत समिती कर्मचार्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी पंचायत समितीच्या कामकाजास सुरुवात राष्ट्रगीताने झाल्यास शाळेतील विद्यार्थ्यांंप्रमाणेच पं.स. कर्मचार्यांमध्येही दिवसभर स्फूर्ती राहील व जनतेची कामे विनासायास आणि पारदश्रीपणे पार पडतील. या उदात्त भावनेतून त्यांनी पंचायत समितीमध्ये दररोज सकाळी राष्ट्रगीताने कामकाजास सुरुवात करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमास २३ मार्च रोजी प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. सभापती संगीता पांढरे, पं.स. सदस्य लक्ष्मणराव अंभोरे, उषा थुट्टे, वैशाली कर्हाडे, जुलेखाँबी सत्तार, कोकिळा खपके, शे.फरीदाबी, बाजार समितीचे माजी सभापती संजय पांढरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी १0 वाजता पंचायत समितीच्या प्रांगणात राष्ट्रगीताने कामकाजास सुरुवात करण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी एस.एम. भुजबळ, सहा. गविअ विभागप्रमुख ए.बी.ताकभाते, व्ही.व्ही. सोनुने, पी.पी. देवकर, कृषी अधिकारी डी.एम. मेरत, आय.टी. इंगळे, सुनील बाहेकर, एम.एस. पवार, बी.जी. वाघ, एच.आर. फदाट, सुनील जुमडे, एस.एस. पाटील, जे.एन. फुलझाडे, अंभोरे, जे.एल.चोपडे, एस.के. सावळे, जे.के. कदम, राजेंद्र वाघमारे, एन.के. कापसे, जे.डी. काळे, डॉ. ईम्रान खान, एकात्मीक बालविकास प्रकल्पाच्या केवट, डॉ.डी.एस. मोरे, अनिल खेडेकर, मिटकरी आदी पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
राष्ट्रगीताने कामकाजाची सुरुवात
By admin | Updated: March 24, 2017 01:25 IST