राज्य शासनाने स्व.आर.आर.पाटील यांच्या नावाने ‘सुंदर गाव स्पर्धा’ आयोजित केली होती. यामध्ये सावरगाव डुकरे या गावाने भाग घेतला होता. त्यानुषंगाने ग्रामपंचायतीने ग्रामहिताच्यादृष्टीने राबविलेल्या विविध उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर या गावाला तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. लोकसहभागातून केलेली कामे, ग्रामपंचायतीच्या स्वतंत्र योजना, गावहितासाठी राबविलेले कल्याणकारी उपक्रम व त्यातून घडलेल्या परिवर्तनामुळे सावरगाव डुकरे तालुक्यात प्रथम ठरले आहे. या गावचे माजी सरपंच विशाल रा.पाटील व तत्कालीन ग्रा.प.सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थांचे यामध्ये योगदान आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच वर्षा निवृत्ती डुकरे व ग्रा.प.सचिव गजानन इंगळे यांना देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी एस.रामामुर्ती, जि.प.अध्यक्षा मनीषा पवार, उपाध्यक्षा कमल बुधवत, सभापती रियाजखॉ पठाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत राजेश लोखंडे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला आहे.
सुंदर गावाचा पुरस्कार सावरगावाला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:38 IST