शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
4
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
5
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
6
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
7
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
8
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
9
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
10
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
11
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
12
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
13
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
14
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
15
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
16
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
17
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
18
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
19
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
20
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत

भरधाव कंटेनरची धडक; बापलेक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:20 IST

डोणगाव : शिवकन्याचे लग्न अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्याची मोठ्या हर्षोल्लासात घरी तयारी सुरू होती. लग्नाचे कपडे ...

डोणगाव : शिवकन्याचे लग्न अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्याची मोठ्या हर्षोल्लासात घरी तयारी सुरू होती. लग्नाचे कपडे आणण्यासाठी नववधू, तीची चुलत बहीण कल्याणी व कल्याणीचे वडील दिनकर शिंगणे हे अन्य काही लोकांसमवेत अमरावतीला गेले. तेथून परत येत असताना भरधाव कंटेनरची कारला जबर धडक लागून कल्याणी व तिच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला. ही ह्रदयद्रावक घटना मालेगाव-मेहकर रस्त्यावरील सरहद पिंपरी गावानजिक शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार बुलडाणा जिल्हयातील शेंदुरजना येथील दिनकर एकनाथ शिंगणे (४४), आणि त्यांची मुलगी कल्याणी दिनकर शिंगणे (१८) अमरावती येथे कुटुंबीयांसोबत शिवकन्या शिंगणे हिच्या लग्नाचा बसता घेण्यासाठी गेले होते. अमरावती येथून परत येत असताना शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील सरहद पिंपरी येथे त्यांच्या एम. एच. ११ सी. डब्ल्यू ०४३६ या क्रमांकाच्या कारला मेहकरकडून येणाऱ्या भरधाव कंटेनरने (क्रमांक एम.एच. १७ बी.व्ही. ६४८९) समोरासमोर धडक दिली. या अपघातात दिनकर शिंगणे व कल्याणी शिंगणे या बापलेकीचा जागीच मृत्यू झाला; तर नंदकिशोर शिंगणे, अशोक शिंगणे, ज्ञानेश्वर शिंगणे, धनंजय शिंगणे, शिवकन्या शिंगणे व कारचालक योगेश बबन ईधारे हे जखमी झाले.