लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : चोरट्यांच्या भीतीने काॅलनीमध्ये गस्त घालत असलेल्या नागरिकांनी रविवारी रात्री अस्वल बघितल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मेहकर शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांनी पुढाकार घेत काॅलनीमध्ये गस्त घालणे सुरू केले आहे. रविवारी रात्री येथील पटवारी काॅलनीत गजानन लाटे, मुरलीधर इंगोले, विजय लहाने, गजानन सरोदे गस्तीवर असताना त्यांना दोन अस्वल दिसली. अस्वल अंगावर येत असल्याने या चौघांनी त्यांना हुलकावणी देत स्वतःचे संरक्षण केले. मात्र या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकाराची वन्यजीव विभागाने तातडीने दखल घेण्याची मागणी हाेत आहे.
मेहकर शहरात अस्वलाचा संचार, नागरिकांमध्ये भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 12:37 IST