शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरशेवलीच्या मंदिरात अस्वलाचा वावर

By निलेश जोशी | Updated: February 29, 2024 20:02 IST

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन.

बुलढाणा : चिखली तालुक्यात येत असलेल्या डोंगरशेवली येथील पुरातन सोमनाथ मंदिरामध्ये अस्वलांचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्ञानगंगा अभयारण्यालगत हा भाग असून प्रादेशिक वनविभागाने या अस्वलांना पकडण्यासाठी मंदिराजवळ पिंजरा लावला आहे. दरम्यान २७ फेब्रुवारी रोजी एक मादी अस्वल व तिची पिल्ले थेट मंदिरामध्ये घुसल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. तेथील तेल, नारळ तथा प्रसाद खाण्यासाठी हे अस्वल येत असावे असा कयास आहे. दरम्यान बुलडाणा वन परिक्षेत्राअंतर्गत येणारे डोंगरशेवली गावं वन्यप्राण्यांच्या मुक्त संचाराने अनेकदा चर्चेत आला आहे. आता पुन्हा या अस्वलांच्या वावरामुळे ते चर्चेत आहे. 

ज्ञानगंगा अभयारण्याला गाव लागून असल्यामुळे बऱ्याचदा बिबट्या, अस्वल, तडस अशा हिंस्त्र प्राण्यांचा या भागातील शेत शिवारात धुमाकूळ चालतो. असे अनेक व्हिडीओ यापूर्वी समोर आले आहेत. या गावात श्री सोमनाथाचे मंदिर आहे. २७ फेब्रुवारीच्या रात्रीचे ९ वाजेच्या सुमारास या मंदिरात एक अस्वल आपल्या तीन पिल्लांसह शिरलं. इतकचं नाही, तर थेट मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन महादेवाच्या पिंडीजवळ हे अस्वलाचं कुटुंब थांबलं. तेथील प्रसाद म्हणून ठेवलेल्या वस्तूही या अस्वलांनी खाल्ल्या. काही क्षण मंदिरात थांबल्यानंतर हे मादी अस्वल व तिची पिल्ले तेथून निघून गेली. हा सगळा प्रकार तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

वनविभागाने लावला पिंजरासंभाव्य धोका पाहता प्रादेशिक वनविभागाने मंदिर परिसरात या अस्वलांना पकड्यासाठी पिंजरा लावला आहे. दरम्यान या मंदिर परिसरात नागरिकांनी एकटे जाऊ नये. तसेच या भागात अस्वल दिसल्यास त्याला हुसकावण्याचा प्रयत्न करू नये. सोबतच सायंकाळच्या वेळीही मंदिराकडे शक्यतो नागरिकांनी जाऊ नये. तसचे या परिसरात सतर्क राहावे, असे प्रादेशिक वनविभागाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा