देऊळगाव राजा : कोरोना संसर्ग संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात धोकादायकरीत्या वाढत असून, बचावात्मक उपाययोजनांसह लसीकरणाचा वेग वाढवावा लागेल. नागरिकांनी लसीकरण करून घ्या, संसर्गापासून स्वतःचे व इतरांचे संरक्षण करा, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य शीला शिंपणे यांनी केले. जवळखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण शुभारंभ प्रसंगी त्या बाेलत हाेत्या.
तालुक्यातील जवळखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी काेविड लसीकरण केंद्राचा शुभारंभ पंचायत समिती सभापती रेणुका बुरकुल व जिल्हा परिषद सदस्य शीलाताई शिंगणे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना नेते धनशीम शिंपणे, सरपंच बबनराव नागरे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजू शिरसाठ, गणेश बुरकुल, माजी सरपंच मनोज राजेजाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.दत्ता मांटे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक करताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मांटे यांनी लसीकरण संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. पंचायत समिती सभापती बुरकुल यांनी कोविड लस सुरक्षित असून, त्यापासून कुठलाच त्रास नाही, असे सांगितले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.दराडे, डॉ.उबाळे यांच्यासह आरोग्यसेविका, आरोग्य सेवक, आरोग्य कर्मचारी, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांची उपस्थिती होती.