शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! जिल्ह्यात पुन्हा वाढतोय डेंग्यूचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 10:50 IST

तीन वर्षात ७८ रुग्णांची भर पडली असून तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती जागतिक डेंग्यू दिनाच्या पूर्वसंध्येला समोर आली आहे.

- योगेश देऊळकार  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात आरोग्य विभागाने राबविलेल्या उपाययोजनांमुळे डेंग्यूच्या रुग्णांची संख्या आटोक्यात आली होती. मात्र आता नागरिकांच्या निष्काळजीमुळे डासांची उत्पत्ती होत असल्याने पुन्हा डेंग्यूचा धोका वाढला आहे. गत तीन वर्षात ७८ रुग्णांची भर पडली असून तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती जागतिक डेंग्यू दिनाच्या पूर्वसंध्येला समोर आली आहे.डेंग्यू हा विषाणूजन्य आजार आहे. या आजाराचा प्रसार एडीस इजिप्टी या डासांच्या मादीपासून होतो. साधारणत: जून ते आॅक्टोबर या कालावधीत याचा जास्त प्रसार होतो. कारण या कालावधीमध्ये पाऊस पडत असल्यामुळे अनुकुल वातावरण असते. हा डास तुलनेने इतर डासांपेक्षा लहान असतो. या आजारावर निश्चित असा औषधोपचार नसल्यामुळे अटकाव करणे हा एकमेव मार्ग आपल्या हातात आहे. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे. परिसरात असलेला केरकचरा एकत्रिक करून जाळून नष्ट करणे. डबकी असल्यास ती त्वरी बुजविणे. आठवड्यातून एक दिवस घरातील पाण्याची सर्व भांडी रिकामी करून स्वच्छ करत कोरडा दिवस पाळणे यासह इतर काही उपाययोजना केल्यास या आजाराला सहजपणे प्रतिबंध घालता येऊ शकतो. जिल्ह्यात या सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबविल्याने व नागरिकांनी देखील काळजी घेत आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन केल्याने हा आजार आटोक्यात आला होता. २०१७ मधील डेंग्यूच्या रुग्णसंख्येवर नजर टाकल्यास हा आकडा केवळ ४ वर आला होता.मात्र नागरिकांनी आवश्यक त्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याने हा धोका वाढला असून २०१८ मध्ये ३६ तर २०१९ मध्ये ३८ असे एकुण तीन वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल ७८ रुग्णांची भर पडली आहे. ही आकडेवारी जिल्ह्यातील नागरिकांसाठी निश्चितच दिलासादायक नसून चिंता वाढविणारी आहे.नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे. डेंग्यूच्या डासाची उत्पत्ती स्वच्छ पाण्यावर होते. त्यामुळे स्वत: लक्ष घालून घरातील पाण्याची भांडी स्वच्छ करावी व पाण्यामध्ये डासांच्या अळ्या नसल्याची खात्री करावी. जेणेकरून या आजारापासून बचाव करणे शक्य होईल.- एस. बी. चव्हाण,जिल्हा हिवताप अधिकारी.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाdengueडेंग्यू