शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

वडगाव येथे बारसला साकारले रामायण, शेकडो वर्षांपासूनची परंपरा

By विवेक चांदुरकर | Updated: November 25, 2023 14:16 IST

जळगाव जामोद तालुक्यातील वडगाव येथे शेकडो वर्षांपासून रामायण साकारण्यात येते.

खामगाव : जळगाव जामोद तालुक्यातील वडगाव येथे रामायण साकारण्याची शेकडो वर्षांपासूनची परंपरा यावर्षीही २४ नोव्हेंबरच्या रात्री बारसनिमित्त जोपासण्यात आली. गावातील लहाणांपासून तर वृद्धांनी रामायणातील विविध पात्र साकारात रामायण सादर केले. गावातील असंख्य नागरिक रात्रभर रामायण बघण्याकरिता उपस्थित होते.

जळगाव जामोद तालुक्यातील वडगाव येथे शेकडो वर्षांपासून रामायण साकारण्यात येते. दिवाळीनंतर रामायणातील विविध पात्र साकारण्याचा सराव करण्यात येतो. रामायणातील पात्रांना शोभणार्या कलावंतांची पात्र साकारण्याकरिता निवड करण्यात येते. काही नागरिक वर्षानुवर्षांपासून विविध पात्र साकारत आहेत. यावर्षीही २४ नोव्हेंबरच्या रात्री ९ वाजताच्या सुमारास सुरूवात करण्यात आली. ज्या ठिकाणी पात्र तयार करण्यात येते. तेथून हनुमान मंदिराजवळ पात्राला वाजत गाजत आणण्यात आले. त्यांच्यासमोर एक परदा लावण्यात आला. यावेळी फटाके फोडण्यात आले. 

सकाळी ६ वाजताच्यादरम्यान रामाने रावणाचा वध केल्यानंतर गावातून राम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांची मिरवूणक काढण्यात आली. मिरवणूक मार्गावर गावातील महिलांनी सडा, सारवण करून रांगोळी काढली. त्यानंतर आरती करण्यात आली. रात्रभर कीर्तनाच्या माध्यमातून रामायणातील विविध पात्रांची माहिती देण्यात आली. तसेच विविध पात्र साकारणार्या कलावंतांनीही उष्कृष्ट संवाद साधले. यादरम्यान काही पात्र मनोरंजनाच्या दृष्टीकोणातूनही सादर करण्यात आले. या सादरीकरणादरम्यान वयोवृद्ध नागरिकांसोबतच लहान मुलेही हिरीरीने सहभाग घेतात. रात्रभर रामायण बघण्याकरिता लहान मुलांपासून वयोवृद्धांची गर्दी झाली होती.

अनेक वर्षांपासून बनवलेले आहेत वस्त्ररामायणातील पात्र साकारताना त्यांचे वस्त्र हे अनेक वर्षांपूर्वी बनविण्यात आले आहेत. तेच वस्त्र दरवर्षी परिधान करण्यात येतात. तसेच तलवार, गदा, भाले यासह विविध वस्तूही अनेक वर्षांपूर्वी तयार करण्यात आल्या आहेत. त्याच वस्तूंचा वापर करण्यात येतो.

बारसला विशेष महत्ववडगाव गावात बारसला विशेष महत्व आहे. दिवाळीनंतर भाऊबिजेला गावातील मुली गावात येत नाहीत तर बारसला येतात. गावातील सुना दिवाळीला माहेरी जातात तर बारसला वडगावात परत येतात. तसेच शहरात नोकरीवर असलेले गावातील नागरिकही बारसच्या दिवशी गावात येतात. यावेळी अनेकांच्या घरी पाहुणे आले असतात.

टॅग्स :buldhanaबुलडाणा