मेहकर (जि. बुलडाणा): पाण्याअभावी सुकत चाललेल्या केळीच्या सुमारे तीन हजार झाडांवर हवालदिल शेतकर्याने कुर्हाड चालवली. मेहकर तालुक्यात भीषण पाणीटंचाई असून फळबागा सुकल्या आहेत. कल्याणा येथील शेतकरी ज्ञानेश्वर रामचंद्र ठाकरे यांनी अडीच एकर शेतामध्ये गतवर्षी केळीची ३ हजार जाडे लावली होती. मात्र पाण्याअभावी केळीची झाडे सुकत चालल्याने अखेर त्यांनी या झाडांवर कुर्हाड चालवली. यामुळे त्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.
केळीच्या तीन हजार झाडांवर कु-हाड !
By admin | Updated: April 12, 2016 01:26 IST