शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

देऊळगावात बालाजी महोत्सव:लाटामंडपाची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 13:44 IST

लक्ष्मी रमण गोविंदाची गर्जना करीत भक्तीभावाने बालाजी मंदिरासमोर असलेल्या दगडी फरसावर लाटा मंडपाची उभारणी करण्यात आली.

- अर्जुनकुमार आंधळे  लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगाव राजा: सुमारे पावणे चारशे वर्षांची परंपरा लाभलेल्या देऊळगाव राजातील प्रति तिरुपती श्री बालाजी महाराज यात्रा उत्सवातील महत्त्वाचा भाग मानल्या गेलेल्या लाटा मंडपाची भक्तिभावाने उभारणी करण्यात आली. रविवारी दुपारी साडेतीन वाजता मंडप उभारण्यास सुरूवात झाली. मंदिरातील घंटानाद व प्रवेशद्वारावरील नगाऱ्यांचा गजर आणि फरसावरील भाविकांनी मंत्रमुग्ध होऊन केलेल्या गोविंदा... गोविंदा...गोविंदाच्या जयघोषाने हजारो भाविकांनी लक्ष्मी रमण गोविंदाची गर्जना करीत भक्तीभावाने बालाजी मंदिरासमोर असलेल्या दगडी फरसावर लाटा मंडपाची उभारणी करण्यात आली.विदर्भ आणि मराठवाड्यातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या देऊळगाव राजातील श्री बालाजी महाराजांच्या यात्रोत्सवाला अश्विन शु.१ घटस्थापनेपासून सुरुवात झाली. श्री व्यंकटेश बालाजी महाराजांच्या या ऐतिहासिक व पारंपारिक उत्सवातील महत्त्वपूर्ण धार्मिक उत्सव म्हणजे लाटा मंडप उभारणी, रविवारी सकाळी अकरा वाजेपासून मंडपाला दोरीने गुंफणे व भुयारातील २१ महाकाय लाटा बाहेर काढण्याचे काम सुरू झाले होते, दुपारनंतर भाविकांनी मंडप उभारणीसाठी फरसावर गर्दी केली होती. एकवीस महाकाय सागवानी लाटा व ४२ मंडपाला अखंड दोरीत बांधून शेकडो भाविकांच्या उपस्थित भक्तीभावाने उभारण्यात येणारा देऊळगाव राजा बालाजींचा हा एकमेव उत्सव आहे. दुपारी साडेतीन नंतर मंदिरातील घंटानाद, प्रवेशद्वारा वरील नगार्यांच्या गजर आणि या बरोबरच 'बोल बालासाहेब की जय', ‘लक्ष्मी रमणा गोविंदा’च्या जयघोषात भाविकांनी लाटामंडप उभारण्यास सुरुवात केली. महाद्वार वेशी लगत असलेल्या हनुमानाची प्राचीन दगडी मूर्ती व संस्थान समोरील गरुडाच्या दगडी मुर्तीला दोर बांधून अखंड दोरीत ४२ मंडप २१ सागवानी लाटांवर गुंफून उभारत असताना लाटांवर नारळांचा होणारा वर्षाव आणि श्रींचा प्रसाद म्हणून श्रीफळ प्राप्त करण्यासाठी त्यावर तुटून पडलेले भाविक हा प्रसंग लाटा उभारण्यादरम्यान अनेकदा पहावयास मिळाला. या धार्मिक उत्सवात सर्वधर्म समभाव पहावयास मिळतो.मंडप उत्सवादरम्यान सर्वधर्म समाज बांधवांना वहिवाटीद्वारे मान दिला जातो. आपल्यावर असलेली जबाबदारी सर्वजण हक्काने पार पाडतात. शेकडो भाविकांच्या सहभागाने लाटा मंडप भक्तीभावाने उभारण्यात आला. सुमारे सात तास चाललेल्या मंडप उभारणीच्या धार्मिक परंपरे दरम्यान भाविकांमधील भक्तिभाव शिगेला पोहोचला होता.

आज मध्यरात्री निघणार पालखीश्री बालाजी महाराजांचा पालखी सोहळा सोमवारला नगर प्रदक्षिणेसाठी मध्यरात्री मंदिरासमोरून निघणार आहे. अठरा ते वीस तास चालणाºया पालखी सोहळ््यादरम्यान अठरा पगड जातीधर्माच्या भाविकांना प्रत्यक्ष बालाजी महाराजांच्या मूतीर्ला स्पर्श करून दर्शन घेता येत असल्याने हजारो भाविक पालखीला हजेरी लावत असतात.

टॅग्स :buldhanaबुलडाणाDeulgaon Rajaदेऊळगाव राजा