शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

बैलजोडी चोरीच्या आरोपावरून दाम्पत्यासह मुलास मारहाण

By admin | Updated: June 5, 2017 02:26 IST

२१ जणांवर अँट्रॉसिटीसह विविध गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कधाड : रूईखेड मायंबा येथील एका शेतकर्‍याच्या शेतातील गोठय़ातून बैलजोडी चोरून नेल्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपावरून येथील पती, पत्नी व मुलास रूईखेडमधील काही लोकांनी मारहाण केली. या घटनेत महिलेने दिलेल्या तक्रारीवरून रूईखेडमधील २१ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन संबंधितावर अँट्रॉसिटी अँक्टखाली ३ जून रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. बुलडाणा तालुक्यातील रूईखेड मायंबा या गावातील फिर्यादी राधाबाई गुलाबराव उंबरकर (वय ५0) या महिलेने धाड पोलिसात तक्रार दिली, की २ जून रोजी रात्री ८.३0 च्या सुमारास रूईखेड गावाकडे घरी जाताना वाटेत, आरोपी सुखराम रामराव उगले, विजय तेजराव उगले व इतर १९ जणांनी मला व पतीस आणि मुलास बैलजोडी चोरण्याच्या आरो पावरून लाठय़ाकाठय़ांनी मारहाण करत विनयभंग केला. सोबत मारहाण करून जातीवाचक शिव्या देऊन जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींवर कलम १४३, ३५४, ३५४ (ख), ३२४, ३२३, १४३, १४७, १४८, २९४, ५0६ तसेच २, ३, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार १९८९ नुसार गुन्हा नोंद केला. या घटनेतील २१ आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. मारहाणीत जखमी राधाबाई उंबरकर व रवींद्र उंबरकर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सुखराम उगले यांनी धाड पोलिसात तक्रार दिली, की आरोपी रवींद्र गुलाबराव उंबरकर, राधाबाई उंबरकर आणि गुलाबराव उंबरकर यांनी माझ्या शेतातील गोठय़ातून बैलजोडी चोरण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना प्रत्यक्ष पकडले, विचारणा केली असता त्यांनी शिवीगाळ केली. पोलिसांनी आरोपींवर कलम ३८0, ४५७, ५११ भादंवि नुसार गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी एसडीपीओ बी.बी. महामुनी यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. तपास बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संग्राम पाटील, एएसआय गजानन मुंढे, ना.पो.कॉ. प्रकाश दराडे, माधव कुटे, विजय मेहेत्रे, गजानन मोरे, दशरथ शितोळे, बळीराम खंडागळे हे करत आहे.