शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

Ayodhya Verdict : खामगाव शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 14:34 IST

खामगाव शहरातील संवेदनशील भागात कलम १४४ अन्वये प्रतिबंधीत आदेश लागू करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव   :  सर्वोच्च न्यायालयाने  अयोध्या प्रकरणी निकाल दिल्यानंतर शनिवारी खामगाव शहरासह परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद तसेच खासगी शाळांना सुटी जाहीर करण्यात आली असून, शहरासह परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. खामगाव शहरातील संवेदनशील आणि प्रमुख वस्त्यांवर पोलिस ड्रोन कॅमेºयावर नजर ठेऊन आहेत.अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील पोलीस प्रशासन तथा पोलिसांचा सोशल मिडिया मॉनिटरींग सेल सतर्क झालेला आहे. खामगाव शहरातील संवेदनशील भागात कलम १४४ अन्वये प्रतिबंधीत आदेश लागू करण्यात आला आहे. त्याचवेळी अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. हेमराजसिंह राजपूत, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षण सुनिल आंबुलकर, शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे निरिक्षक रविंद्र सूर्यवंशी आपल्या पथकासह खामगाव शहरातील विविध ठिकाणी भेटी देत आहेत. दुपारी १२ वाजता महावीर चौक तसेच शहरातील इतर चौकांवर ड्रोन कॅमेºयाच्या सहाय्याने नजर ठेवली जात आहे.सुरक्षेच्या दृष्टीने खामगाव शहरात एसआरपीची एक कंपनी, आरसीपी बुलडाणाचे दोन पथक, शिवाजीनगर आणि शहर पोलीस स्टेशनचे ३०० कर्मचारी, १ एएसपी, १ एसडीपीओ, आणि १५ अधिकारी विविध उपाय योजनेच्या दृष्टीकोनातून प्रयत्नशिल आहेत. याशिवाय हेल्मेट, काठी, बॅरिकेटस आणि नळकांड्या आदी साहित्याची जुळवाजुळव करण्यात आली आहे. एक अ‍ॅब्युलन्स आणि दोन फिरती वाहनेही शहरात तैनात ठेवण्यात आले आहेत. संवदेशील भागावर ड्रोन कमेºयाची नजर!शहरातील शिवाजी नगर आणि शहर पोलीस स्टेशन अंतर्गत जलालपुरा परिसरातील टिळक मैदान, वसतकार डेअरी, मोची गल्ली, बुरड गल्ली, आठवडी बाजार, महावीर चौक, जलालपुरा, वाल्मिक चौक, गौतम चौक, सुदर्शन नगर, सम्राट अशोक नगर, बाळापुर फैल, माखरीया मैदान, शाह नगर, चांदमारी, मेहबुब शाह नगर, शेलोडी रोड, शंकर नगर, गौसुल आझम चौक, बोबडे कॉलनी, स्विपर कॉलनी, हरीफैल मस्जीद, वामन नगर, समता कॉलनी, समन्वय नगर, टिचर कॉलनी, तायडे कॉलनी, मरीअम कॉलनी तसेच शिवाजी नगर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मस्तान चौक परिसरातील काही भागावर पोलिसांचे ड्रोन कॅमेºयावर नजर राहणार आहे.

 खामगावात शांतता! शहरातील दैनंदिन व्यवहार नेहमीप्रमाणेच सुरळीत आहेत. शहरातील महावीर चौक, बसस्थानक चौक, गांधी चौक, मुख्य बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत असल्याचे दिसून येत आहे. दुपारपर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचा दावा पोलिस सुत्रांनी केला आहे.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याkhamgaonखामगावPoliceपोलिस