शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

जिगाव प्रकल्पाला केंद्राच्या निधीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 11:19 IST

Jigaon Irrigation Project केंद्र सरकारकडून मिळणारा २३९ कोटी ५८ लाख रुपयांचा निधीच उपलब्ध झालेला नाही.

- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्याचा सिंचन अनुशेष भरून काढण्याच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या जिगाव प्रकल्पाचा बळीराजा संजीवनी योजनेअंतर्गत समावेश असून गेल्या दोन वर्षापासून या प्रकल्पासाठी आनुषंगिक योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून मिळणारा २३९ कोटी ५८ लाख रुपयांचा निधीच उपलब्ध झालेला नाही. गेल्या वर्षी जवळपास ९० टक्के भूसंपादनाची प्रकरणे व्यपगत होण्याची भीती पाहता थेट मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन त्यासंदर्भातील प्रश्न मार्गी लावावा लागला होता. दरम्यान, बळीराजा संजीवनी योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या या प्रकल्पाला केद्र सरकारकडून मिळणारा २५ टक्के निधीही उपलब्ध होऊ शकलेला नाही. परिणामी २०२५ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याच्या उद्दिष्टाला खो बसण्याची भीती व्यक्त होत आहे. बळिराजा संजीवनी योजनेअंतर्गत या प्रकल्पासाठी राज्याकडून ७५ टक्के तर केंद्र सरकाकडून २५ टक्के निधी मिळतो. त्यापैकी केंद्राच्या हिश्श्याचा दोन वर्षाचा निधी उपलब्ध झालेला नाही.प्रकल्पाच्या बांधकामावर आतापर्यंत २,२३२ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. २०१७ पासून आजपर्यंत हा निधी खर्च झाला आहे. दरम्यान, यातील राज्याच्या वाट्याचा १,६७ कोटी ४१ लाख रुपयांचा निधी तर केंद्राच्या वाट्याचा ५५८ कोटी १४ लाख रुपयांचा निधी खर्च झालेला आहे. मात्र केंद्र सरकाकडून अद्यापही  २३९ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध होणे बाकी आहे. २०१९-२० या वर्षात अपेक्षित असलेला १०६ कोटी ४१ लाख रुपयांच्या निधीपैकी केंद्राकडून प्रत्यक्षात ३९ कोटी ५३ लाख रुपयेच प्रकल्पासाठी देण्यात आले होते. २०२० मध्ये कोरोनाची साथ महत्तम पातळीवर असल्याने लावण्यात आलेल्या लॉकडाऊन व वित्त विभागाच्या काही निर्णयांमुळे प्रकल्पाला अपेक्षित निधी मिळू शकला नाही. त्यात केंद्राकडून अपेक्षित असलेला १७२ कोटी ७ लाख रुपयांच्या निधीचाही समावेश आहे. गेल्या दोन वर्षाचा विचार करता २०१९-२० या वर्षाचा रखडलेला ६६ कोटी ८८ लाख आणि २०२०-२१ या वर्षाचा १७२ कोटी ७० लाख रुपयांच्या निधीचा समावेश आहे. दरम्यान, जिगाव प्रकल्पासाठी  १३ हजार ८७४ कोटी ६० लाख रुपये खर्च अपेक्षित असून त्यापैकी ४,६०० कोटी रुपयांचा खर्च आतापर्यंत प्रकल्पावर झालेला आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प