शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात चित्ररथाद्वारे योजनांचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 17:59 IST

बुलडाणा: शासनाचा विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना होत नसल्याने खरे लाभार्थी त्यापासून वंचीत राहतात. त्यामुळे शासकीय योजनांची गावोगावी माहिती पोहचविण्यासाठी जिल्ह्यात चित्ररथाद्वारे योजनांचा जागर सुरू आहे.

बुलडाणा: शासनाचा विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना होत नसल्याने खरे लाभार्थी त्यापासून वंचीत राहतात. त्यामुळे शासकीय योजनांची गावोगावी माहिती पोहचविण्यासाठी जिल्ह्यात चित्ररथाद्वारे योजनांचा जागर सुरू आहे. सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांचा प्रचार प्रसार करणाºया  या चित्ररथाला जिल्हाधिकाºयांनी हिरवी झेंडी दाखविली आहे. जिल्ह्यात या चित्ररथाकडून योजनांचा प्रसार सध्या सुरू आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत विविध कल्याणकारी योजनांची माहिती अनुसूचीत जाती, नवबौध्द या प्रवर्गातील मागासवर्गीय लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी रमाई आवास योजना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, सावित्रीबाई फूले शिष्यवृत्ती योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, स्वयंसहाय्य्क बचत गटांना मिनी ट्रॅक्टर योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, कन्यादान योजना, आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर योजना या व इतर अनेक योजनांची माहिती सामाजिक न्याय विभागाच्या चित्ररथाव्दारे जिल्ह्यातील अनेक गावांत प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. या चित्ररथास जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दूबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वºहाडे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण डॉ. अनिता राठोड, जिल्हा माहिती अधिकारी एस. के. बावस्कर आदी अधिकारी व कर्मचारी तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. योजनांच्या माहितीअभावी लाभार्थी वंचीतअनेक नागरिक शासनाच्या योजनांपासून अनभिज्ञ असतात. योजनांची माहिती नसल्याने त्यांना त्याचा लाभही मिळत नाही. योजनांपासून लाभार्थी वंचीत राहू नये, यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत चित्ररथ तयार करण्यात आला आहे. ज्या चित्ररथाद्वारे शासनाच्या योजनांची माहिती सर्वसामान्यांच्या दारोदारी पोहचत आहे. परिणामी, योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाgovernment schemeसरकारी योजना