शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

मेहकर तालुक्यात शेततळ्यांमुळे १२ कोटी लीटर पाण्याची उपलब्धता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 23:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम : ‘मागेल त्याला शेततळे’, ही योजना मेहकर तालुक्यात शेतकर्‍यांसाठी संरक्षित शेती सिंचनासाठी उपयुक्त ठरत आहे. मेहकर तालुक्यात तब्बल १४0 शेततळे पूर्ण झाले असून, जवळपास १२ कोटी २६ लाख लीटर पाणी  उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचा कल या योजनेकडे वाढला आहे. राज्यात गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी ...

ठळक मुद्देसंरक्षित शेती सिंचनासाठी सोयशेततळी आणि शाश्‍वत सिंचन

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम : ‘मागेल त्याला शेततळे’, ही योजना मेहकर तालुक्यात शेतकर्‍यांसाठी संरक्षित शेती सिंचनासाठी उपयुक्त ठरत आहे. मेहकर तालुक्यात तब्बल १४0 शेततळे पूर्ण झाले असून, जवळपास १२ कोटी २६ लाख लीटर पाणी  उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचा कल या योजनेकडे वाढला आहे. राज्यात गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी तसेच अनिश्‍चित झाले आहे. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पूर्णत: पावसावर अवलंबून असलेल्या पिकावर, तसेच त्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धनच्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्‍वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी शेतकर्‍यांसाठी  ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. यापूर्वी झालेला शेततळय़ांच्या कामामुळे शेतकर्‍यांना खरीप हंगामात पावसाच्या खंडित कालावधीत फायदा झाला असून, उत्पादनात काही प्रमाणात शाश्‍वतता आली आहे. आतापर्यंत मेहकर तालुक्यातील १४0 शेततळय़ांचे काम पूर्ण झालेले आहे. या शेततळय़ांच्या माध्यमातून पावसाचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी जमिनीतच जिरविण्यात आल्याने परिसरातील विहीर व बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. पावसाळय़ाच्या दिवसांत हेच शेततळे किमान तीन वेळा पावसाच्या पाण्याने भरल्या जात असल्याने कमी-अधिक छत्तीस कोटी लीटर पाण्याची उपलब्धी होत आहे. यापैकी काही भागात पाणी जिरते, तर उर्वरित पाणी पावसाच्या खंडित कालावधीत शेती सिंचनासाठी वापरण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा फायदा झाला आहे.

विहिराला रब्बी हंगामात पाणी कमी असते. या शेततळ्याचा फायदा झाला असून, रब्बी हंगामात तूर आणि हरभरा पिकाला संरक्षित सिंचनाचा फायदा यामुळे मिळाला.-अविनाश अर्जुन दुतोंडे, शेतकरी, उसरण.

शेततळे निर्माण केल्यामुळे शेतकर्‍यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होत आहे. शेततळे ही योजना शेतकर्‍यांसाठी संजीवनी देणारी योजना ठरली आहे.- गणेश गिरी, उपविभागीय कृषी अधिकारी, मेहकर.

टॅग्स :buldhanaबुलडाणा