नीलेश शहाकार / बुलडाणा उपग्रहामार्फत थेट संपर्क साधून तापमान आणि पर्जन्यमानाच्या योग्य नोंदी होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात स्वयंचलित हवामान यंत्रणा निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी तेराही तालुक्यांतील निवडक गावांमध्ये ९0 ह्यऑटोमॅटिक वेदर स्टेशनह्ण बसविण्यात येणार आहे; मात्र गत दोन वर्षांपासून ही प्रक्रिया रखडली आहे. दोन वर्षांपूर्वी हे काम पूर्ण झाले असते, तर अवकाळी पाऊस, दुष्काळ व अल्प पर्जन्यमानाचा काहीअंशी वेळीच अंदाज लागूून शेतकर्यांचे नुकसान टाळता आले असते.पाऊस कधी पडणार, हवेचे तापमान, मृदा तापमान, सापेक्ष आद्र्रता, पर्जन्यमान, वार्याचा वेग, वार्याची दिशा, सूर्याची किरणे, हवेचा दाब आदी बाबींची दर तासाला नोंद घेता यावी तसेच याद्वारे जिल्ह्यातील शेतकर्यांना मार्गदर्शन करून पीक उत्पादनात वाढ आणि पिकांवरील संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये येणार्या महसूल मंडळामध्ये स्वयंचलित हवामान यंत्र (ऑटोमॅटिक वेदर स्टेशन) बसविण्याबाबत प्रक्रिया दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली होती.जिल्ह्यात सध्या ९0 ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र कार्यरत आहे. या ठिकाणी जिल्ह्यातील कोणत्या भागात किती पाऊस पडला, याचीच केवळ नोंदणी घेण्यात येते. याच धर्तीवर ह्यऑटोमॅटिक वेदर स्टेशनह्ण स्थापन करण्याचा आराखडा तयार करण्यात आला. कृषी विभाग व नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्वेक्षण करून, याबाबतचा अहवाल यापूर्वीच जिल्हा प्रशासनाच्या सुपूर्द करण्यात आला होता; मात्र यंत्रे स्थापन करण्यासाठी स्थळनिश्चितीच्या कामात दिरंगाई झाल्यामुळे हा प्रकल्प गत दोन वर्षांपासून जिल्ह्यात रखडला आहे.
स्वयंचलित हवामान यंत्रणा रखडली!
By admin | Updated: June 16, 2016 02:23 IST