शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव बस स्थानकावर भाजीपाल्याची हर्रासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 16:43 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, बसस्थानक आणि नगर पालिका शाळेच्या आवारात भाजीपाला हर्राशीला सुरूवात करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर पालिका प्रशासनाच्यावतीने खामगाव शहरातील भाजीपाला अडत गत महिनाभरापासून बंद ठेवण्यात आली होती.दरम्यान, शेतकऱ्यांना तसेच भाजीपाला विक्रेत्यांना भाजी विक्रीसाठी तत्वत: मान्यता देत, शहरात पाच ठिकाणी भाजीपाला अडत सुरू करण्यात आली आहे. भाजीपाला अडत सुरू झाल्याने गत दीड महिन्यांपासून बंद असलेल्या बसस्थानकावर गुरूवारी गर्दी दिसून आली.खामगाव येथील भाजीपाला हर्राशीत फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे निदर्शनास येताच नगर पालिका मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी सुरूवातीला खामगाव येथील भाजीपाला हर्राशीत रात्रीच्या वेळी भेटी दिल्या. तीन भेटीत गंभीर परिस्थिती आढळून आल्याने, भाजी विक्री करणाºया व्यापाऱ्यांना सुरूवातीला नोटीस देण्यात आली. मात्र, परिस्थितीत काहीही सुधारणा न झाल्यामुळे मुख्याधिकाºयांनी खामगाव येथील भाजीपाला हर्राशी बंद केली. गत महिनाभरापूर्वी हा निर्णय घेण्यात आला. तत्पूर्वी शहरात भाजी विक्रीसाठी ८० आणि फळ विक्रीसाठी २५ दुकानांना परवानगी देण्यात आली. मात्र, भाजीपाला हर्राशी बंद झाल्याने आसपासच्या परिसरातील शेतकरी आणि भाजी विक्रेत्यांचे हाल होत असल्याचे निदर्शनास येताच मुख्य भाजीपाला अडत वगळता इतर ठिकाणी ५ तात्पुरत्या स्वरूपातील अडत सुरू करण्याचा निर्णय घेतला. फिजीकल डिस्टन्सिंग आणि इतर बांबीची पूर्तता केल्यानंतर तत्वत: खामगाव शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, बसस्थानक आणि नगर पालिका शाळेच्या आवारात भाजीपाला हर्राशीला सुरूवात करण्यात आली.गुरूवारी या हरार्शीचा पहिलाच दिवस होता. मात्र, तरीही या ठिकाणी शेतकरी आणि भाजीपाला अडत्यांचा चांगला प्रतिसाद दिसून आला. परिसरातील शेतकºयांना सुविधा व्हावी, यासाठी भाजीपाला अडत सुरू करण्यात आली. मात्र, या ठिकाणी फिजीकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशाराही मुख्याधिकाºयांनी संबंधितांना दिला आहे.अडत सुरू करण्यापूर्वी भाजीपाला अडते आणि शेतकºयांना पालिका प्रशासनाच्यावतीने सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर बुधवारी रात्री हर्राशी सुरू करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. गुरूवारी सकाळी प्रत्यक्ष हर्राशीला सुरूवात करण्यात आली.

पालिका मैदानावरही झाली हर्राशी!बसस्थानक, आंबेडकर मैदान, आणि नगर पालिका शाळेत भाजीपाला हर्राशी सुरू करण्यापूर्वी या ठिकाणी फिजीकल डिस्टन्सिंगसाठी रकाने आखण्यात आले. प्रत्येक अडतीत १०० मीटरचे अंतर ठेवण्यात आले. त्यानंतरच आंबेडकर मैदान आणि नगर पालिका शाळेत भाजीपाला हर्राशीला सुरूवात करण्यात आली.

 

 

टॅग्स :khamgaonखामगाव