ब्रम्हानंद जाधव /मेहकर (बुलडाणा)हिंदू-मुस्लिमांच्या एकतेचे प्रतीक म्हणून केवळ तालुक्यातच नव्हे तर पश्चिम वर्हाडातील तीनही जिल्ह्यात संत अवलिया महाराजांची ख्याती आहे. तालुक्यातील मोळा येथे दरवर्षी कार्तिक पैर्णिमेला उंट, घोड्यांच्या लवाजमात अवलियांचा संदल निघतो; त्या दिवसापासून आठवडाभर चालणार्या अवलिया यात्रा माहोत्सवात पश्चिम वर्हाडातील सर्व धर्मियांचे लोक एकत्र येऊन राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवितात. तालुक्यातील मोळा येथे सुमारे २५0 वर्षांपूर्वी संत अवलीया महाराजांचे आगमन झाले होते. सुरूवातीला खंडुजी पाचरणे हे त्यांचे शिष्य होते. संत अवलिया महराजांच्या कार्याने त्यांचे शिष्य वाढत गेले. दरवर्षी मोळा येथील त्यांच्या समाधी स्थळावर कार्तिक पैर्णिमेला संत अवलिया महाराजांचा यात्रा महोत्सव भरतो. हा यात्रा महोत्सव जवळपास १0 दिवस चाल तो. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी उंट, घोड्यांच्या लवाजमात अवलियांचा संदल निघतो. तर दुसर्या दिवशी भाविकांना पुरी-भाजीचा महाप्रसाद वाटप केला जातो. या महा प्रसादाचा व संदलच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी पश्चिम वर्हाडातील बुलडाणा, अकोला व वाशिम जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून भाविक येतात. संत अवलिया महाराजांच्या पादुका, चिमटा, कंदील, त्रिशुल भक्तांच्या दर्शनासाठी ठेवले जाते. *यात्रेतून पशूहत्या हद्दपारयात्रेच्या सुरूवातीच्या काळात मोठय़ा प्रमाणात पशु हत्या केली जायची. यात्रेमध्ये निष्पाप पशुंना आपले जीवन गमवावे लागायचे. त्यावर प.पू. दिलीपबाबा, सामूहिक विवाहाचे प्रणेते शिवाजीराव नवघरे यांच्यासह ग्रामस्थांच्या प्रयत्नाने पशुहत्या बंद करण्यात आली. आता गत दहा वर्षांपासून यात्रेत पशुहत्या बंद झाली असून, पुरी-भाजीचा नैवेद्य दाखविला जातो.
अवलियांच्या रुपाने घडते राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन
By admin | Updated: November 6, 2014 23:20 IST