शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

पत्नीचा ओढणीने गळा आवळून राजूर घाटात जीवे मारण्याचा प्रयत्न; अकोल्यातील एकास अटक

By निलेश जोशी | Updated: October 25, 2023 17:35 IST

होमगार्डच्या सतर्कतेने अनर्थ टळला

बुलढाणा: मुळचा जळगाव जामोद तालुक्यातील परंतू काही कालावधीपासून अकोल्यातील जुन्या शहरात खैर मोहमद प्लॉट परिसरात रहाणाऱ्याने एकाने घटस्फोट देण्याच्या निमित्ताने लिखापडी करावयाची आहे असे सांगून पत्नीस बुलढाणा शहारनजीकच्या राजूर घाटात देवीच्या मंदीराच्या पाठीमागील जंगाल नेत तेथे अेाढणीने तिचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. परंतू पीडित महिलेने आरडाअेारड केल्याने नजीकच असलेल्या दोन होमगार्डनी धाव घेत महिलेचा जीव वाचविल्याची घटना २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.

या प्रकरणी जुना अकोला येथील आरोपी शेख इब्राहीम शेख चाँद यास बुलढाणा शहर पोलिसानी अटक केली आहे. दरम्यान त्यास २५ ऑक्टोबर रोजी पुन्हा न्यायालयत हजर करण्यात आले आहे. या प्रकरणी नजमा सय्यद मुस्तफा (३०, रा. भगतवाडी, नुरी प्लॉट गल्ली क्र. ४) या पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे.

बुलढाणा शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी २४ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेमध्ये दिलेल्या माहितीनुसार नजमा सय्यद मुस्तफा हीला तिचा पती शेख इब्राहीम शेख चाँद याने घटस्फोट (तलाख) देण्यासाठी लिखापडी करावयाची असल्याने दुचाकीवर दोन मुलांसह बसून आणले होते. दरम्यान बाळापूर येथे दोन्ही मुलांना ठेवून त्याने नजमा सय्यद मुसत्फाला खामगाव मार्गे बुलढाणा येथे व तेथून मलकापूर मार्गावरील राजूर घाटात नेले. २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास राजूर घाटातील देवीच्या मंदीराजवळ जंगलात नेत तेथे अेाढणीने तिचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाअेारड केल्याने तेथे जवळच पोलिस चौकीत असलेल्या दोन होमगार्डनी धाव घेत महिलेला त्याच्या तावडीतून सोडविले. प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरोधात खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

होमागार्ड व दोन मुलींनी वाचविले प्राणसायंकाळी आरोपी शेख इब्राहीम शेख चाँद याने पत्नी नजमाला राजूर घाटातील मंदीराजवळ असलेल्या टेकडीवर नेले. तेथे तिचा अेाढणीने गळा आवळून खून करण्याचा त्याने प्रयत्न गेला. त्यावेळी नजमाने आरडा आरेड केली. देवीच्या मंदीराजवळ असलेल्या पोलिस चौकीत बसलेल्या दोन होमगार्डनी महिलेचा आवाज एकला व त्या दिशेने ते पळाले. यावेळी धावण्याच्या सरावासाठी घाटात आलेल्या दोन मुलींनीही त्यांना मदत केली. या घटनाक्रमादरम्यान महिला मात्र बेशुध्द पडली होती, अशी माहिती ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी