शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंंगा - नळगंगा नदी जोड प्रकल्पाला गती देण्याचा प्रयत्न- जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 17:46 IST

Jayant Patil News मुळ प्रस्ताव आहे, तो मंजूर होणे आवश्यक आहे, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बुलडाणा येथे स्पष्ट केले.

ठळक मुद्देमाँ जिजाऊ जलसमृद्धी नदीजोड प्रकल्प समितीही त्यासाठी आग्रही आहे.प्रकल्पद्वारे विदर्भातील जिल्ह्यांना मिळणार ६० टीएमसी पाणी.

बुलडाणा: वैनगंगा-नळगंगा या नदीजोड प्रकल्पाला गती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तो एकदा कागदावर मंजूर झाला की त्याचे पाणी विदर्भात कशा पद्धतीने खेळवायचे हे आपल्या हातात आहे. प्रामुख्याने या प्रकल्पातंर्गत ६० टीएमसी पाणी आणणे आणि विदर्भातील जिल्ह्यात टप्प्या टप्प्याने वाटप होणे हा जो मुळ प्रस्ताव आहे, तो मंजूर होणे आवश्यक आहे, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बुलडाणा येथे स्पष्ट केले. वैनगंगा-नळगंगा या नदी जोड प्रकल्पासोबतच पैनगंगा नदीही त्यास जोडल्यास बुलडाणा जिल्ह्यातील घाटावरील तालुक्यांसह वाशिम, यवतमाळसह अन्य जिल्ह्यांनाही त्याचा लाभ होईल. त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची मागणी होत आहे. माँ जिजाऊ जलसमृद्धी नदीजोड प्रकल्प समितीही त्यासाठी आग्रही आहे. त्यासंदर्भाने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी ही बाब स्पष्ट केली.

मुख्यत्वे ६० टीएमसी पाणी आणण्याचे आपले प्रयत्न आहेत. त्याचा पाठपुरावा सुरू आहे. त्यात निश्चितच आपण एका चांगल्या निष्कर्षाप्रत येवू असे जलसंपदामंत्री जयंत पाटील पुढे म्हणाले.दरम्यान अमरावती विभागातील सिंचन अनुशेष दुर करण्यासाठी मधल्या काळात फारसे यश आले नाही. त्यात अडचणी आल्यात. तो दुर करण्यासाठी सध्या जिल्हानिहाय आपण बैठका घेत आहोत. सध्याच्या आढावा बैठकांचा हाच मुळ उद्देश असल्याचे ते म्हणाले. जेणेकरून या विभागातील प्रकल्पांच्या कामांना गती यावी. सोबतच अडचणी दुर होवून उपलब्ध निधी खर्च व्हावा यासाठी आपण प्रयत्नरत असल्याचे ते म्हणाले. सोबतच जिगाव प्रकल्पाच्या कामालाही गती देणार असून जिगाव प्रकल्प पुर्णत्वाच्या दृष्टीने केंद्राकडून उपलब्ध होणार जवळपास २०० कोटी रुपयांचा निधी मधल्या दोन वर्षात उपलब्ध झाला नाही. तो येत्या काळात मिळेल अशी आशा आहे. यासोबतच पुनर्वसन व भुसंपादनाचे काही जटील प्रश्न मार्गी लावून येत्या काळात किमान सात टीएमसी पाणी जिगाव प्रकल्पात साठविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे ना. पाटील म्हणाले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलbuldhanaबुलडाणा