शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वारसा हक्काने नोकरीसाठी दोघांचा आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 14:45 IST

बुलडाणा : वारसा हक्काने सेवेत सामावून घेण्यासाठी दोन जणांनी गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

बुलडाणा : वारसा हक्काने सेवेत सामावून घेण्यासाठी दोन जणांनी गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन दोघांनाही ताब्यात घेतले. सतीश कांबळे आणि राहीबाई साबळे अशी आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांची नावे आहे.यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, सिंदखेडराजा नगरपालिकेमध्ये मालनबाई छगन कांबळे व ममताबाई नामदेव साबळे या दोघी सफाई कामगार म्हणून कार्यरत होत्या. सन १९९७ मध्ये दोघीही सेवानिवृत्त झाल्या. वारसा हक्कानुसार त्यांच्या जागी सेवेत सामावून घेण्यासंदर्भात अनुक्रमे सतीश तुळशीराम कांबळे व राहिबाई रंगनाथ साबळे यांनी पालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र प्रशासनाने जाणिवपूर्वक टाळाटाळ करुन फसवणूक केल्याचा आरोप वारसदारांनी केला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. परंतू अपेक्षित कार्यवाही झाली नाही. सतीश कांबळे यांनी याच मागणीसाठी मध्यंतरी उपोषणही केले होते. परंतू त्यावेळी आश्वासन देऊन त्यांना उपोषण मागे घेण्यास सांगण्यात आले. मात्र आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नव्हती. वारसा हक्काने सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी जवळपास त्यांनी २१ वर्ष पाठपुरावा केला होता. मात्र त्याचा काहीच फायदा होत नसल्याने सतीश कांबळे व राहीबाई साबळे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. शहर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन त्यांचा प्रयत्न हाणून पाडला.

टॅग्स :buldhanaबुलडाणा