शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वन्यप्राण्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला; ७ जनावरे मृत, ४ जखमी,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 18:04 IST

पातुर्डा (जि. बुलडाणा): येथील भरवस्तीत २० जुलैच्या रात्री अज्ञात वन्यप्राण्याने मेंढ्या व बकऱ्यांच्या कळपावर हल्ला चढवला. यात ओंकार बापुना पुंडे या शेतकऱ्याच्या ४ बकऱ्या व ३ मेंढ्या ठार झाल्या तर काही जनावरे जखमी झाली.

ठळक मुद्देओंकार बापुना पुंडे या शेतकऱ्याच्या ४ बकऱ्या व ३ मेंढ्या ठार झाल्या. सदर हल्ला दोन वन्यप्राण्यांनी केला असल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.

पातुर्डा (जि. बुलडाणा): येथील भरवस्तीत २० जुलैच्या रात्री अज्ञात वन्यप्राण्याने मेंढ्या व बकऱ्यांच्या कळपावर हल्ला चढवला. यात ओंकार बापुना पुंडे या शेतकऱ्याच्या ४ बकऱ्या व ३ मेंढ्या ठार झाल्या तर काही जनावरे जखमी झाली. वनविभाग व पशुधन विकास विभागाने याबाबत घटनास्थळाला भेट देवून पंचनामा केला. दरम्यान, तडस या वन्यप्राण्यांनी हा हल्ला केला असावा, असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.पातुर्डा येथील भरवस्तीत वार्ड क्र.३ मध्ये २० जुलैच्या रात्री काही वन्यप्राण्यांनी गोठ्यात बांधलेल्या बकऱ्या व मेंढ्यांवर हल्ला चढवला. सदर हल्ला दोन वन्यप्राण्यांनी केला असल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. ओंकार बापुना पुंडे यांच्या घराशेजारीच त्यांच्या जनावरांचा गोठा आहे. या गोठ्यातील ४ बकऱ्या व ३ मेंढ्या अशी एकूण ७ जनावरे या हल्यात मृत्यूमुखी पडली. ४ जनावरांना किरकोळ जखमा झाल्या. याबाबत ओंकार पुंडे यांनी दिलेल्या माहितीवरुन वनविभागाचे एस.जी. खान व पशुवैद्यकीय अधिकारी ए.ए. पटेल यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. यावेळी ७ जनावरे मृत व ४ जनावरे जखमी आढळली. मृत जनावरांचे शवविच्छेदन करण्यात आले असून जखमींवर पातुर्डा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करण्यात आले. दरम्यान शेतकºयाने ५ जनावरे बेपत्ता असल्याचे सांगितले. यात शेतकऱ्याचे सुमारे एक लक्ष रुपयाचे नुकसान झाले असून नुकसान भरपाईची मागणी शेतकरी ओंकार पुंडे यांनी केली आहे.शेतकऱ्यांच्या माहितीवरुन घटनास्थळाला भेट दिली असता शेळ्या, मेंढ्या अशी ७ जनावरे मृत तर ४ जनावरे जखमी झाल्याचे आढळून आले. तडस नर व मादी या प्राण्यांनी हा हल्ला केला असावा, असा अंदाज आहे. नियमानुसार शेतकऱ्याला मदत दिली जाईल.- एस.जी. खान, वनपरीक्षेत्र अधिकारी, वरवट बकाल

 

टॅग्स :khamgaonखामगावwildlifeवन्यजीव