शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बुलढाणा शहराध्यक्षांवर हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक

By संदीप वानखेडे | Updated: September 9, 2023 16:21 IST

याप्रकरणी बुलढाणा शहर पाेलिसांत तिघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप वानखडे,  बुलढाणा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बुलढाणा शहराध्यक्ष अनिल दत्तात्रय बावस्कर यांच्यावर तिघांनी ८ सप्टेंबर राेजी रात्री प्राणघातक हल्ला केला. सजग असलेल्या बावस्कर यांनी हा हल्ला परतवून लावत एकास पकडले, तर अन्य दाेघे पळून गेले. याप्रकरणी बुलढाणा शहर पाेलिसांत तिघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राकाँचे शहराध्यक्ष अनिल बावस्कर हे ८ सप्टेंबर राेजी रात्री ८ वाजता डाेसा सेंटरवर हाेते. यावेळी अचानक दाेन अज्ञात व्यक्ती ताेंड बांधून तेथे आले, त्यांनी त्यांच्याजवळील लाेखंडी राॅडने बावस्कर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी सजग असलेल्या बावस्कर यांनी राॅड उजव्या हाताने अडवला. त्यावेळेस तेथे हजर असलेले शुभम प्रल्हाद काळे, सोनू श्रीराम अनासुने हे त्यांच्या मदतीला धावल्याने त्यांनी एका हल्लेखाेरास पकडले. तसेच दुसरा हल्लेखाेर दुचाकीवरील तिसऱ्याच्या मदतीने पसार झाला.

पकडलेल्या हल्लेखाेराला बावस्कर यांनी बुलढाणा शहर पाेलिसांत आणले. तेथे त्याला नाव विचारले असता त्याने गजानन विलास शिंदे (रा. माणिकनगर, जालना) असे सांगितले. याप्रकरणी बावस्कर यांच्या फिर्यादीवरून बुलढाणा शहर पाेलिसांनी तिन्ही आराेपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पाेलिस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी