शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संग्रामपुरात एटीएम चोरणारे जालन्यात पकडले; दोन कुख्यात आरोपी अटकेत, तीन फरार 

By विवेक चांदुरकर | Updated: January 7, 2024 17:55 IST

ग्रामपूर शहरातील दाटवस्तीतून रात्री ३ वाजता दरोडेखोरांनी भारतीय स्टेट बँकेची एटीएम मशीन पळवून नेली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : संग्रामपूर शहरातील अख्खे एटीएम लंपास करणाऱ्या टोळीच्या मुसक्या जालना पोलिसांनी आवळल्या आहेत. नाकाबंदी दरम्यान जालना जिल्ह्यातील मौजपुरी पोलिस ठाणे हद्दीत रामनगर साखर कारखाना परिसरामध्ये रविवारी सकाळी साडेआठ वाजेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. गुन्ह्यात सहभागी २ आरोपींना पकडण्यात आले. ३ आरोपी फरार झाले आहेत. संग्रामपूर शहरातील दाटवस्तीतून रात्री ३ वाजता दरोडेखोरांनी भारतीय स्टेट बँकेची एटीएम मशीन पळवून नेली होती. या घटनेची माहिती प्राप्त होताच पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी केली होती.

सकाळी साडेआठ वाजता जालना जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मौजपुरी पोलिसांना रामनगर साखर कारखाना परिसरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने काही व्यक्ती असल्याची माहिती प्राप्त झाली. कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना आरोपींजवळ संग्रामपूर येथून पळवून नेलेली एटीएम मशीन दिसून आली. मौजपुरी पोलिसांनी आरोपींकडून एटीएम मशीनसह इतर मुद्देमाल जप्त करून दोघांना बेड्या ठोकल्या. या एटीएम मशीनमध्ये १७ लाख ७८ हजारांची रोकड असल्याची माहिती आहे. रविवारी रात्री ३ वाजेच्या सुमारास दरोडेखोर एका चारचाकी वाहनाने आले. एटीएम मशीनला त्यांनी चारचाकी वाहनाला बांधून बाहेर ओढले. ती मशीन वाहनात टाकून त्यांनी पळ काढला.

आरोपींना अशा ठोकल्या बेड्याजालना जिल्ह्यातील मौजपुरी पोलिसांना काही व्यक्ती दरोडा टाकण्यासाठी आल्याची माहिती मिळाली. पोलिस रामनगर कारखाना समोरील एका पडक्या घराजवळ खात्री करण्यासाठी गेले. त्याठिकाणी ५ व्यक्ती एक एटीएम मशीन कापताना दिसून आले. सोबतच एक विनाक्रमांकाचे चारचाकी वाहन दिसले. पोलिसांनी तातडीने २ आरोपींना रंगेहाथ पकडले. ३ आरोपी फरार झाले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव दयासिंग गुलजारसिंग टाक (४५), नरसिंह अतरसिंग बावरी (६०), दोघेही रा. शिकलकरी मोहल्ला, मंगळ बाजार, ता.जि. जालना येथील आहेत. तर, पळून गेलेला आकाशसिंग नरसिंग बावरी व इतर दोन अनोळखी असून आरोपींविरुद्ध मौजपुरी पोलिस ठाण्यात कलम ३९९, ३०२ सह आर्म ॲक्ट कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सिसिटीव्ही कॅमेय्रावर मारला रंगाचा फवारा  चोरट्यांनी एटीएम चोरण्यापूर्वी सिसिटीव्ही कॅमेय्रावर रंगाचा फवारा मारला.   

दरोडा टाकण्याच्या उद्देशाने काही जण आल्याची माहिती होती. घटनास्थळी धाव घेतली असता आरोपींकडे एटीएम मशीन दिसून आले. दोघांना ताब्यात घेण्यात आले. तीन आरोपी फरार आहेत.- आर.पी. नेटके,पोलिस उपनिरीक्षक,मौजपुरी, पोलिस स्टेशन जालना.

टॅग्स :Thiefचोर