शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

एटीएम रक्कम अपहारप्रकरणी आरोपीच्या घराची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 12:31 IST

खामगाव: एटीएममध्ये भरावयाची रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी वापरल्याप्रकरणी फरार असलेल्या एका आरोपीच्या घराची मंगळवारी शहर पोलिसांनी झाडाझडती घेतली. तर दोन आरोपींची बँकखाती गोठविली.विविध बँकांच्या एटीएममध्ये पैशांचा भरणा करण्याची जबाबदारी असलेल्या एटीएम सर्व्हीस असोसिएटस्शी संगणमत करून पाच जणांनी ४९ लाखाचा अपहार केल्याचे प्रकरण शुक्रवारी उघडकीस आले. याप्रकरणी लॉजीकॅश सोल्युशनचे शाखा व्यवस्थापक चेतन ...

ठळक मुद्दे योगेश हजारेच्या एबीआय आणि सीबीआय या दोन बँकेतील तर इद्रिसचे एसबीआय बँकेतील खाते गोठविले. आरोपींचे मोबाईल बंद असल्यामुळे पोलिसांनी आरोपींच्या मोबाईलचा सीडीआर आणि एडीआर डाटाही गोळा केल्याचे समजते.

खामगाव: एटीएममध्ये भरावयाची रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी वापरल्याप्रकरणी फरार असलेल्या एका आरोपीच्या घराची मंगळवारी शहर पोलिसांनी झाडाझडती घेतली. तर दोन आरोपींची बँकखाती गोठविली.

विविध बँकांच्या एटीएममध्ये पैशांचा भरणा करण्याची जबाबदारी असलेल्या एटीएम सर्व्हीस असोसिएटस्शी संगणमत करून पाच जणांनी ४९ लाखाचा अपहार केल्याचे प्रकरण शुक्रवारी उघडकीस आले. याप्रकरणी लॉजीकॅश सोल्युशनचे शाखा व्यवस्थापक चेतन अशोक धुळे रा. औरंगाबाद यांच्या तक्रारीवरून एटीएम सर्व्हीस असोसिएटस् मनोहर माणिकराव खेडेकर, पत्रकार योगेश हजारे, इद्रिस आणि त्याचे वडील जहीर यांच्यासोबतच इद्रिसचा मित्र साजीद याच्या विरोधात कलम ४०६, ४०८, ४०९ (३४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मनोहर खेडेकर पोलिस कोठडीत असून उर्वरित चारही आरोपी फरार आहेत. फरार आरोपींपैकी इद्रिसच्या जुनाफैल भागातील घराची शहर पोलिसांनी झाडाझडती घेतली. पोलिस निरिक्षक संतोष ताले यांच्या नेतृत्वात भोपळे, संतोष वाघ, एपीसी प्रियंका राठोड, अंजूम शेख, दिनेश घुगे, धंदर यांनी ही कारवाई केली. तर  पत्रकार योगेश हजारेच्या एबीआय आणि सीबीआय या दोन बँकेतील तर इद्रिसचे एसबीआय बँकेतील खाते गोठविले. दरम्यान, आरोपींचे मोबाईल बंद असल्यामुळे पोलिसांनी आरोपींच्या मोबाईलचा सीडीआर आणि एडीआर डाटाही गोळा केल्याचे समजते.

आरोपींच्या बांधकामाच्या तिन्ही साईटची पाहणी!

एटीएम अपहार प्रकरणातील रक्कम व्यावसायिक फ्लॅट तसेच व्यापारी गाळे बांधण्यासाठी वापरण्यात आल्याची कबुली पोलिस कोठडीत असलेल्या मनोहर खेडेकर यांने दिली. त्यानुसार मंगळवारी शहर पोलिसांनी आरोपी योगेश हजारे, इद्रिस आणि खेडेकर यांच्या बांधकाम साईटची पाहणी केली. पोलिस आरोपींच्या मागावर असून, एका आरोपीचे लोकेशन मिळाल्याचा सुत्रांचा दावा आहे. या आरोपीस अटक करण्यासाठी पोलिसांनी व्यूहरचना केल्याची माहिती आहे.

टॅग्स :khamgaonखामगावCrimeगुन्हा