मेहकर तालुक्यातील सुकळी येथील लक्ष्मी किशोर मोरेंचे लग्न एका वर्षापूर्वी लोणार तालुक्यातील वेणी येथील किशोर सुखलाल मोरे यांच्यासोबत झाले होते. पती किशोर, सासू व सासरे लग्नापासून छोट्या छोट्या कारणावरून तिला त्रास देत होते. १६ मार्चला पती किशोर मोरे याने घरासमोर असलेले कुटार उचलण्यास सांगितले. त्या वेळी माझी तब्येत खराब असल्याने कुटार नंतर उचलते असे म्हटले असता पती किशोर याने लोखंडी गजाने मारहाण करून हाताची बोटे मोडली व त्या नंतर सासू शोभा सुखलाल मोरे, सासरा सुखलाल बालू मोरे, दीर आकाश सुखलाल मोरे यांनी चापटा- बुक्क्यांनी मारहाण केल्याचे विवाहितेने पाेलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. जर घडलेली घटना तुझ्या वडिलांना सांगितली तर विहिरीत ढकलून देण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून मेहकर पोलिसांनी चारही जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
विवाहितेस मारहाण, सासरच्या चाैघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:32 IST