शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

बुलढाण्यात असलम शहांचीच चर्चा; १० हजारांची सुटी नाणी देत भरला लोकसभेसाठी अर्ज

By निलेश जोशी | Updated: April 3, 2024 17:49 IST

हटके पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची त्यांची ही तऱ्हा त्यांना मतदारांनी तारले तर त्यांची अनामत रक्कम वाचवू शकते.

नीलेश जोशी, बुलढाणा: लोकसभा निवडणुकीतील राजकीय पक्षांची जुगलबंदी सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु बुलढाण्यातील एका उमेदवाराने चक्क १ रुपयांची दहा हजार नाणी अर्थात दहा हजार रुपये आणि दहा व २० रुपयांच्या नोटा अनामत रक्कम म्हणून २ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. त्यामुळे असलम शहा नेटकऱ्यांसह जनमानसात चर्चेत आले आहे.

हटके पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची त्यांची ही तऱ्हा त्यांना मतदारांनी तारले तर त्यांची अनामत रक्कम वाचवू शकते. बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी महालोकशाही आघाडीचे उमेदवार म्हणून असलम शहा हसन शहा यांनी २ एप्रिल रोजी त्यांचा उमेदवारी अर्ज भरला. परंतु त्यांनी त्यांच्यासोबतच्या भरभक्कम थैलीत नेमके काय आणले हे प्रसारमाध्यमांनी त्यांना विचारले असता त्यांच्या सुट्या नाण्यांची गोष्ट समोर आली. मग काय त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच दहा हजार रुपये किमतीची एक रुपयांची नाणी तेथेच रस्त्यावर सर्वांना दाखवली.

गंमत म्हणजे त्यांनी संपूर्ण रक्कमच चिल्लर स्वरूपात आणली होती. दहा हजार रुपये किमतीची एक रुपयांची नाणी त्यांच्याजवळ असतानाच दहा व २० रुपयांच्या नोटाही त्यांनी सोबत आणल्या होत्या. लोकसभा निवडणुकीसाठी भरावयाची अनामत रक्कम म्हणून उर्वरित १५ हजार रुपये त्यांनी दहा आणि २० रुपयांच्या नोटांमध्ये आणले होते. विशेष म्हणजे गावागावातील नागरिकांकडून त्यांनी ही नाणी गोळा करत आपली २५ हजारांची अनामत रक्कम भरली आहे.त्यांच्या या अचाट कल्पनेमुळे मराठीतील ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या चित्रपटातील नाऱ्या अर्थात नारायण वाघची व्यक्तीरेखा डोळ्यासमोर आल्याशिवाय रहात नाही.

हम पाचही है!

बर दहा हजार नाण्यांची भरभक्कम थैली व तुकोबारायांसारखी पगडी डोक्यात घालून आपल्या चार सहकाऱ्यांसह असलमशहा नेमके कोठे चालेल असा जिल्हाधिकारी कार्यालयात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांना प्रश्न पडला होता. त्यामुळे त्यांनी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अडवले. तेव्हा, ‘असलम शहा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जात असून हम पाचही है!’ असे उत्तर त्यांच्यासोबत असलेल्या ॲड. सतीशचंद्र रोठे यांनी दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना आत सोडले. निवडणूक विभागाची मात्र नाणी मोजताना चांगलीच तारांबळ यावेळी उडाली होती. आता त्यांना मतदार तारतात की त्यांचे डिपॉझिट जप्त होते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. परंतु सुट्या नाण्यांमुळे ते चर्चेत आले आहेत.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४buldhanaबुलडाणा