शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

लाखनवाडा सरपंचाला मारहाण; ग्रामपंचायत सदस्यासह सहा जण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 15:45 IST

लाखनवाडा :  येथील सरपंच निर्मला समाधान देशमुख यांना ग्रामपंचायतच्या विशेष सभेत मारहाण करून जखमी केल्यामुळे सरपंच निर्मला देशमुख यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी ग्रामपंचायत सदस्य रमेश सावळे यांच्यासह सहा जणांविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून सर्वच  आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायत सदस्य सरला रमेश सावळे व सरपंच निर्मला देशमुख यांच्या शाब्दीक वाद झाला त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले होते. सरपंच निर्मला देशमुख यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला तक्रार दिली.सहा जणांविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून सर्वच  आरोपींना अटक करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

लाखनवाडा :  येथील  ग्रामपंचायतच्या विशेष सभेत मारहाण करून जखमी केल्यामुळे सरपंच निर्मला देशमुख यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी ग्रामपंचायत सदस्य रमेश सावळे यांच्यासह सहा जणांविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून सर्वच  आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सरपंच निर्मला समाधान देशमुख यांनी दिलेल्या सरपंचपदाच्या राजीनामा पत्रावरील स्वाक्षरी सत्यतता पडताळणी करीता १८ जून रोजी ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा बोलाविण्यात आली असता सभेच्या चर्चेदरम्यान ग्रामपंचायत सदस्य सरला रमेश सावळे व सरपंच निर्मला देशमुख यांच्या शाब्दीक वाद झाला त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले होते. सरला सावळे व त्यांच्या समर्थकांना सरपंच निर्मला देशमुख यांना जबर मारहाण करून जखमी केले. त्यामुळे सरपंच देशमुख यांच्यावर सामान्य रूग्णालय खामगाव येथे उपचार सुरू आहेत. भाजपच्या दोन्ही गटात हा वाद उफाळून आला आहे.  या घटनेमुळे गावात व परिसरात राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.(वार्ताहर)

 मी दिलेल्या सरपंचपदाच्या राजीनामा पत्रावरील स्वाक्षरी सत्यता पडताळणीकरीता १८ जून रोजी सभा सुरू असतानाच ग्रामपंचायत सदस्य सावळे व त्यांचे समर्थक यांनी माझ्यावर हल्ला करून मला जबर मारहाण केली. सदर घटनेची कुणकुण लागल्यामुळे मी पोलीस स्टेशनला अर्ज करून पोलीस संरक्षण मागितले होते. परंतु मला मारहाण सुरू असताना पोलीस, ग्रामपंचायत सभागृहाच्या बाहेर होते. त्यांनी सुध्दा मारेकºयांना आवर घातला असता तर सदर घटना टळली असती.

- निर्मला समाधान देशमुख, सरपंच लाखनवाडा.

या घटनेमागे राजकीय षडयंत्र असून मला त्यामध्ये विनाकारण गोवल्या जात आहे. घटना ही ग्रामपंचायतीच्या आवारात घडली. आपण ग्रामपंचायतीचे सदस्य नसल्याने सभेत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ५०-६० ग्रामस्थांच्या उपस्थितीत विनयभंग करण्याचा प्रश्नच येत नाही.

-सुभाष सावळे, जिल्हा उपाध्यक्ष भाजप, किसान आघाडी, बुलडाणा. 

टॅग्स :khamgaonखामगावCrimeगुन्हा